esakal | ZIM vs PAK 2nd T20I : ल्यूकनं कोणाची कॉपी केलीये माहितेय (VIDEO)

बोलून बातमी शोधा

luke jongwe
ZIM vs PAK 2nd T20I : ल्यूकनं कोणाची कॉपी केलीये माहितेय (VIDEO)
sakal_logo
By
टीम ई सकाळ

ZIM vs PAK 2nd T20I: घरच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध खेळणाऱ्या झिम्बाब्वेने दुसऱ्या टी-20 सामन्यात पहिल्या पराभवाचा हिशोब चुकता केला. झिम्बाब्वेने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकाकत 9 बाद 118 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 99 धावांत गारद झाला. टार्गेट चेस करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. आतंतराष्ट्रीय टी 20 सामन्यात झिब्वाब्वेचा पाकिस्तान विरुद्धचा हा पहिला विजय ठरला. या विजयासह झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

हेही वाचा: IPL 2021: पहिली फिफ्टी लेकीसाठी; 'विराट' सेलिब्रेशन पाहिले का? (VIDEO)

पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीतील निराशजनक कामगिरीमुळे त्यांचा हा निर्णय फोल ठरला. झिम्बाब्वेकडून कामुनुखुमवे (Tinashe Kamunhukamwe) याने सर्वाधिक धावा केल्या. 40 चेंडूतील 34 धावांची खेळी केली होती. दुसऱ्याबाजूला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 41 धावांची खेळी केली. आल्यूक जोंगवे याने त्याची विकेट घेतली. आणि पाकिस्तानची गणिते बिघडली.

ल्यूक जोंगवे (Luke Jongwe) ने पाकिस्तान विरुद्ध 18 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बाबरची विकेट घेतल्यानंतर त्याने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. त्याने चक्क पायातील बूट काढून फोन कानाला लावल्याचे कृती केली. सोशल मीडियावर याची खूपच चर्चा रंगली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी देखील अशा प्रकारेच सेलिब्रेशन करताना यापूर्वी पाहायला मिळाले होते. त्याची कॉपी केल्यानंतर आता ल्यूक चर्चेत आलाय.