क्रिकेटमध्ये राजकारण! आयसीसीकडून झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे थेट निलंबन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

आयसीसीने गुरुवारी झालेल्या बैठकीत झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला. लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

लंडन : आयसीसीने गुरुवारी झालेल्या बैठकीत झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला. लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

या निलंबनामुळे आता त्यांना आयसीसीकडून मिळणारी फंडींग यापुढे मिळणार नाही. तसेच आयसीसीच्या कोणत्याही कार्यक्रमात झिम्बाब्वे संघाला सहभागी होता होणार नाही. तसेच आता पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठीच्या पात्रताफेरीतील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. 

''कोणत्याही सदस्यावर बंदी आणण्याचा निर्णय हा गंभीर आहे. मात्र, खेळात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही,'' असे स्पष्टीकरण आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिले. 

पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या 5-10 या तारखांमध्ये झिम्बाब्वेचा संघ भारतात तीन ट्वेंटी20 सामने खेळण्यास येणार होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zimbabwe cricket board suspended by ICC