Zimbabwe Vs India : झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने मने जिंकली; सामना 'खास' मुलांसाठी समर्पित

Zimbabwe Cricket is dedicating the 2nd ODI vs India to childhood cancer in Zimbabwe
Zimbabwe Cricket is dedicating the 2nd ODI vs India to childhood cancer in Zimbabwe esakal

Zimbabwe Vs India 2nd ODI : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा वनडे सामना आज हरारे येथ सुरू झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दुसरा सामना झिम्बाब्वेमधील कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी समर्पित केला आहे. (Zimbabwe Cricket is dedicating the 2nd ODI vs India to childhood cancer in Zimbabwe)

Zimbabwe Cricket is dedicating the 2nd ODI vs India to childhood cancer in Zimbabwe
ZIM vs IND 2nd ODI Live : शार्दुल ठाकूरचा भेदक मारा; झिम्बाब्वेचा डाव 161 धावात संपला

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ट्विट केले की, 'झिम्बाब्वे क्रिकेटने भारताविरूद्धचा दुसरा वनडे सामना देशातील कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा काम किड्जकॅन मार्फत केले जाईल. आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आजच्या सामन्यात नारंगी रंगाचे किट वापरणार आहोत.' याचबरोबर त्यांनी #NoChildShouldBeLeftBehind हा हॅशटॅगही वापरला.

Zimbabwe Cricket is dedicating the 2nd ODI vs India to childhood cancer in Zimbabwe
VIDEO : असंच नीरज चोप्रा होता येत नाही; कष्ट करावे लागतात | Neeraj Chopra Workout

दरम्यान, दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 38.1 षटकात 161 धावात गुंडाळले. शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. तर झिम्बाब्वेने सेन विलियम्सने 42 धावांची झुंजार खेळी केली. त्याला रेयान ब्लरने 39 धावा करून चांगली साथ दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com