VIDEO : झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा बसमध्ये धिंगाणा; कांगारूंवरचा विजय दणक्यात साजरा

Zimbabwe Defeat Australia Players Celebrate In Team Bus Video Gone Viral
Zimbabwe Defeat Australia Players Celebrate In Team Bus Video Gone Viralesakal

Zimbabwe Defeat Australia : झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्यात मायदेशात पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाच्या फूल स्ट्रेंथ टीमचा तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत झिम्बाब्वेने वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्यांदाच ऑल आऊट केला. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयामुळे झिम्बब्वेची वनडे सुपर लीग क्रमवारीत उसळी घेण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी पात्र होण्याची शक्यताही वाढली आहे.

Zimbabwe Defeat Australia Players Celebrate In Team Bus Video Gone Viral
Mohammad Hafeez : भारत पैसा कमवून देतो म्हणून ICC चा लाडका; पाकचा माजी कर्णधार बरळला

दरम्यान, ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी टीम बसमध्ये चांगलाच धिंगाणा घातला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ झिम्बाब्वे क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. याला 'कॅसल कॉर्नर पहा तुम्ही काय केलं आहे? मात्र यासाठी आम्हाला कोण जबाबदार धरणार आहे. देश आणि देशाबाहेरून संघाला दिलेल्या पाठिंबा आणि प्रेरणेसाठी आभार!'

Zimbabwe Defeat Australia Players Celebrate In Team Bus Video Gone Viral
Team India Photos: पाकला पुन्हा एकदा धूळ चारण्यासाठी टीम इंडियाचे धाकड सज्ज

या व्हिडिओत स्टार फलंदाज सिकंदर रझासह झिम्बाब्वेचे खेळाडू गाणं म्हणत डान्स करताना दिसत आहेत. झिम्बाब्वेने प्रथम गोलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाचा 141 धावांवर खुर्दा उडवला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (94) आणि ग्लेन मॅक्सवेल (19) या दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. रयान बुर्लने 10 धावात 5 विकेट घेत अवघ्या 3 षटकात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद केला.

ऑस्ट्रेलियाच्या 142 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे 7 फलंदाज बाद झाले. मात्र अखेर त्यांनी 39 व्या षटकात हे 142 धावांचे आव्हान पार करत ऐतिहासिक विजय मिळवला. झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चाकाबावाने खेळाडूंच्या कष्टाचे चीज झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, 'आम्ही शेवटपर्यंत लढलो. ही खेळाडूंच्या कष्टाची परीक्षा होती.' झिम्बाब्वेने जरी तिसरा वनडे सामना जिंकला असला तरी त्यांनी तीन वनडे सामन्यांची मालिका 2 - 1 अशी गमावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com