ZIM vs IND : झिम्बावेच्या खेळाडूंना मिळतात महिन्याला फक्त 1100 रूपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zimbabwe Football Players earn 1100 rupees a month condition of football is so bad

ZIM vs IND : झिम्बावेच्या खेळाडूंना मिळतात महिन्याला फक्त 1100 रूपये

हरारे : झिम्बावे देशात खेळाची अवस्था खूप वाईट आहे. खेळाडूंना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. झिम्बावेमध्ये (Zimbabwe) खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक खेळातील (Sports) खेळाडूंची थोड्याफार फरकाने अवस्था अशीच आहे. मग गोष्टी क्रिकेटची (Cricket) असो, फुटबॉलची असो किंवा इतर कोणत्याही खेळाची. कोरोनामुळे झिम्बावे आंतरराष्ट्रीय संघ निलंबित करण्यात आला आहे. यामुळे अनेक फुटबॉलपटूंची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत तेथील फुटबॉलपटू व्यावसायिक फुटबॉल क्लबकडून खेळत रोजच्या गरजा भागवत आहे. (Zimbabwe Football Players Earn 1100 Rupees a Month)

हेही वाचा: FIFA च्या कारवाईवर योग्य ती पावले उचला; SC चे केंद्राला निर्देश

अल जझीराने दिलेल्या एका वृत्तानुसार झिम्बावेमधील फुटबॉल क्लब कडून खेळणाऱ्या खेळाडूला क्लब सरासरी 5000 डॉलर्स (झिम्बावे चलन) प्रती महिना देत आहे. तुम्हाला हा आकडा वाचून खूप मोठा वाटेल. मात्र याची भारतीय रूपयातील किंमत ही जवळपास 1100 रूपयांपर्यंतच आहे. दुसरीकडे झिम्बावे दौऱ्यावर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघातील क श्रेणीतील खेळाडू देखील महिन्याला लाखो रूपये कमावतो.

हेही वाचा: पॉटिंगने केली सूर्यकुमारची तुलना डिव्हिलियर्सशी; सलमान बटच्या पोटत दुखलं

झिम्बावेमध्ये अशा प्रकारे पैसे घेऊन खेळणे हे कायद्याविरूद्ध आहे. हे सरकारच्या नियमाविरूद्ध होते. मात्र आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे सामने झिम्बावेमध्ये होत नाहीत. त्यामुळे खेळाडूंकडे आपले घर चालवण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नाही. झिम्बावेची राजधानी हरारे येथील अशा फुटबॉल सामन्यांना लोकांची देखील प्रचंड गर्दी असते. स्थानिक पोलीस आणि लष्कर देखील अशा सामन्यांवर नजर ठेवून असतात. अशा परिस्थिती पैसे देऊन खेळवण्यात येणारे फुटबॉल सामने सकाळी 8 वाजता आयोजित केले जातात जेणेकरून सामन्याला फार गर्दी होणार नाही.

Web Title: Zimbabwe Football Players Earn 1100 Rupees A Month Condition Of Football Is So Bad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketmoneyFootball