पॉटिंगने केली सूर्यकुमारची तुलना डिव्हिलियर्सशी; सलमान बटच्या का पोटात दुखलं!| Ricky Ponting SuryaKumar Yadav AB De Villiers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ricky Ponting Compare SuryaKumar Yadav To AB De Villiers Pakistan Former Captain Salman Butt Reaction

पॉटिंगने केली सूर्यकुमारची तुलना डिव्हिलियर्सशी; सलमान बटच्या का पोटात दुखलं!

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) नुकतेच आयसीसी रिव्हूमध्ये भारताच्या सूर्यकुमार यादवची (SuryaKumar Yadav) फलंदाजी पाहताना 360 डिग्री प्लेअर एबी डिव्हिलियर्सची (AB De Villiers) आठवण होते असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटला (Salman Butt) काही रूचले नाही. त्याने एबी डिव्हिलियर्ससारखी क्षमता असलेला दुसरा फलंदाज पाहिला नाही असे वक्तव्य केले.

हेही वाचा: Shikhar Dhawan : कर्णधारपद गेलेला शिखर धवन म्हणाला अनुभव आहे तो...

बट्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, 'ज्या प्रकारचे क्रिकेट एबी डिव्हिलियर्सने खेळले. मला वाटते की सध्याच्या इतिहासात अशा प्रकारचे क्रिकेट कोणी खेळले नाही. ज्या प्रकारे त्याचा प्रभाव होता ते पाहता विरोधी संघाला त्याला बाद केले नाही तर सामना आपल्या हातून गेला हे माहिती होते. रूट, विलियमसन, कोहली जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे. त्यांनी अविश्वसनीय शतक केले आहेत. रोहित शर्मा देखील आपल्या दिवशी वनडे सामन्यात 250 धावा करतो. त्यामुळे कदाचित पॉटिंगला जेट लॅग झालं असावं.'

हेही वाचा: FIFA World Cup Qualifier : ब्राझील - अर्जेंटिनीचा 'ती' स्थगित झालेली मॅच होणारच नाही

बटच्या मतानुसार पॉटिंगने सूर्यकुमारची तुलना एबी डिव्हिलियर्सशी करण्यापूर्वी सूर्यकुमारने मोठ्या स्पर्धेत आपली योग्यता सिद्ध करून दाखवेपर्यंत वाट पहायला हवी होती. बट म्हणाला, 'सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता कुठे खेळण्यास सुरूवात केली आहे. त्याच्याजवळ चांगली प्रतिभा आहे. मात्र त्याची तुलना थेट एबी डिव्हिलिर्सशी करण्यापूर्वी रिकी पॉटिंगने थोडी वाट पहायला हवी होती. सूर्यकुमारला अजून मोठी स्पर्धा खेळायची आहे. एबी डिव्हिलियर्स सारखा दुसरा खेळाडू नाही. तुम्ही त्याची तुलना विव्ह रिचर्ड्सशी करू शकता.'

Web Title: Ricky Ponting Compare Suryakumar Yadav To Ab De Villiers Pakistan Former Captain Salman Butt Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..