PAK vs ZIM | VIDEO : झिम्बाब्वेने पाकला पाजले पाणी, शेवटच्या षटकातला टर्निंग पॉईंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zimbabwe have defeated Pakistan by 1 run last five over thriller pak vs zim match T20 World Cup 2022

PAK vs ZIM | VIDEO : झिम्बाब्वेने पाकला पाजले पाणी, शेवटच्या षटकातला टर्निंग पॉईंट

Pakistan vs Zimbabwe : पाकिस्तानच्या संघाला टी-20 विश्वचषकात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताविरुद्ध शेवटच्या चेंडूवर पराभूत झालेला पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वेविरुद्धही शेवटच्या चेंडूवर पराभूत झाला. या पराभवामुळे पाकिस्तानला आता उपांत्य फेरीत जाणे कठीण झाले आहे. आता पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी नशिबाची साथ लागेल. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 130 धावा केल्या आणि पाकिस्तानला केवळ 129 धावाच करता आल्या. पाकिस्तानी संघ एकामागून एक चुका करत गेला आणि शेवटी सामना एका धावेने गमावला.

पाकिस्तानी संघाची 16व्या षटकापर्यंत चांगल्या स्थितीत होता. शान मसूद क्रिझवर होता असं वाटत होत की पाकिस्तान सहज जिंकेल पण त्याने आपली विकेट गमावली आणि पाकिस्तानचा संघ अवघ्या पाच धावा करू शकला. इथून पाकिस्तानचा त्रास वाढू लागला. 17 व्या षटकात नागरवाने शानदार गोलंदाजी करत फक्त तीन धावा दिल्या.

आता शेवटच्या तीन षटकात पाकिस्तानला विजयासाठी 29 धावांची गरज होती. मोहम्मद वसीमने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला, पण उरलेल्या चेंडूंवर त्याला एकापेक्षा जास्त धावा घेता आल्या नाहीत. या षटकात एकूण सात धावा आल्या. आता पाकिस्तानला विजयासाठी 12 चेंडूत 22 धावांची गरज होती. पहिल्या तीन चेंडूत चार धावा आल्या, मात्र चौथ्या चेंडूवर नवाजने षटकार ठोकला. पुढच्या दोन चेंडूंवर एक धाव झाली. या षटकात एकूण 11 धावा झाल्या आणि पाकिस्तान संघ सामन्यात परतला.

पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. ब्रॅड इव्हान्सच्या पहिल्याच चेंडूवर नवाजने लॉग ऑफवर शॉट खेळला. पण झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विनने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत बाऊंड्री अडवली. पाकिस्तानी फलंदाजाने त्या चेंडूवर तीन धावा केल्या. मात्र, पुढच्याच चेंडूवर वसीमने चौकार मारला. आता पाकिस्तानला चार चेंडूत चार धावांची गरज होती आणि पुढच्या चेंडूवर वसीमने एक धाव घेतली.

शेवटच्या षटकातला टर्निंग पॉईंट -

चौथ्या चेंडूवर नवाजला एकही धाव करता आली नाही. आणि दोन चेंडूत 3 धावांची गरज असताना तो त्या चेंडूवर तो बाद झाला. आता पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदीने हवेत फटका खेळला. मात्र, शाहीन आफ्रिदीला दुसरी धाव पूर्ण करता आली नाही आणि पाकिस्तानी संघाने एका धावेने सामना गमावला.