KL Rahul : कर्णधार राहुल स्वतः सलामीला आला अन् दुसऱ्याच षटकात परतला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zimbabwe Vs India 2nd ODI KL Rahul sent himself up the order to open but Out In 2nd Over

KL Rahul : कर्णधार राहुल स्वतः सलामीला आला अन् दुसऱ्याच षटकात परतला

Zimbabwe Vs India KL Rahul : भारताचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी दोघांनीच 190 धावांचे आव्हान पार केल्याने राहुलला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आशिया कपपूर्वी फलंदाजीचा सराव व्हावा यासाठी दुसऱ्या सामन्यात केएल राहुल सलामीला आला. मात्र दुसऱ्याच षटकात व्हिक्टर न्यायूचीने 5 धावांवर बाद केले. (Zimbabwe Vs India 2nd ODI KL Rahul sent himself up the order to open but Out In 2nd Over)

हेही वाचा: Asia Cup 2022 : भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का | Shaheen Afridi

दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 38.1 षटकात 161 धावात गुंडाळले. शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. तर झिम्बाब्वेने सेन विलियम्सने 42 धावांची झुंजार खेळी केली. त्याला रेयान ब्लरने 39 धावा करून चांगली साथ दिली. भारताने झिम्बाब्वेचा डाव 161 धावात संपुष्टात आणला.

हेही वाचा: Jhulan Goswami : चकदा एक्सप्रेस थांबणार! इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर झुलन होणार निवृत्त

भारताकडून शार्दुल ठाकूरने 38 धावा देत 3 तर प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलने प्र्त्येकी 1 विकेट घेतली. झिम्बाब्वेचे शेवटचे दोन फलंदाज धावबाद झाले.

टॅग्स :CricketODIKL Rahul