ZIM vs IND 3rd ODI : सिकंदर रझाचे झुंजार शतक, भारताचा शेवटच्या षटकात विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZIM vs IND 3rd ODI Live

ZIM vs IND 3rd ODI : सिकंदर रझाचे झुंजार शतक, भारताचा शेवटच्या षटकात विजय

Zimbabwe vs India 3rd ODI : झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने झुंजार 115 धावांची शतकी खेळी करत भारताचे टेन्शन वाढवले होते. मात्र अखेर भारताने शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना 13 धावांनी जिंकत मालिका 3 - 0 अशी खिशात टाकली. भारताने झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र झिम्बाब्वेला 49.3 षटकात सर्वाबाद 276 धावांपर्यंतच मजल मारता आली. झिम्बाब्वेकडून सेन विलियम्सने 45 तर ब्रॅड इव्हान्स झुंजार 28 धावा केल्या. भारताकडून आवेश खानने 3 तर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि दीपक चाहरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तत्पूर्वी भारताकडून शुभमन गिलने 130 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याला इशान किशनने 50 तर शिखर धवनने 40 धावा करून चांगली साथ दिली.

 273-8 : आवेश खानने अखेर शतकी भागीदारी संपवली

आवेशने 48 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इव्हान्सला 28 धावांवर बाद केले. याचबरोबर सिकंदर आणि इव्हान्सची 75 चेंडूत केलेली 103 धावांची झुंजार भागीदारी संपुष्टात आली.

 ZIM 254/7 (46.3) : सिकंदर रझाचे शतक

सिकंदर रझाने तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी करत झिम्बाब्वेला 250 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याने ब्रॅड इव्हान्स सोबत आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

217-7 (42.1 Ov) : सिकंदर रझाचे झुंजार अर्धशतक, भारताचे टेन्शन वाढले

झिम्बाब्वेचा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सिकंदर रझाने भारताविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात देखील झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या झुंजार खेळीमुळे झिम्बाब्वेने अखेरच्या 10 षटकात सामन्यात रंगत निर्माण केली

122-5 : झिम्बाब्वेचा निम्मा संघ माघारी

अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने झिम्बाब्वेला ठराविक अंतराने धक्के देत त्यांचा निम्मा संघ गारद केला.

84-3 : आवेश खानने खाते उघडले

आवेश खानने सेट झालेल्या मोनयोंंगाला 15 धावांवर बाद करत भारतला तिसरे यश मिळवून दिले.

82-2 : अक्षर पटेलने जोडी फोडली

अक्षर पटेलने विलियम्सला 45 धावांवर बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

झिम्बाब्वेने भागीदारी रचली

झिम्बाब्वेच्या सेन विलियम्स आणि टॉनी मोनयोंंगा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचली.

7-1 : चाहरने दिला पहिला धक्का

भारताचे 290 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेला दीपक चाहरने पहिला धक्का दिला. त्याने इनोसेन्ट काईआला 6 धावांवर बाद केले.

IND vs ZIM : प्रथम फलंदाजी करताना भारताने केल्या 289 धावा

भारताने झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 130 धावा केल्या. त्याच्याशिवाय इशान किशनने 50, धवनने 40 आणि कर्णधार राहुलने 30 धावा केल्या.

भारताची आठवी विकेट पडली

शार्दुल ठाकूरच्या रूपाने भारताला आठवा धक्का बसला आहे. त्याने सहा चेंडूंत नऊ धावा केल्या. यासह इव्हान्सने या सामन्यात पाच बळी घेण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याने प्रथमच वनडेत पाच विकेट्स घेतल्या आहेत.

अक्षर पटेल बाद  

अक्षर पटेलही केवळ एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अक्षरला सिकंदर रझाने झेलबाद केले. भारताची धावसंख्या सध्या 47.4 षटकात 6 बाद 272 अशी आहे. शुभमन गिल 125 धावा करून क्रीजवर आहे.

दीपक हुड्डा बाद

भारताला आणखी एक धक्का बसला आहे. दीपक हुडा केवळ एक धाव काढून ब्रॅड इव्हान्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताची धावसंख्या 43 षटकांत 4 बाद 227 अशी आहे. शुभमन गिल 99 आणि संजू सॅमसन 0 धावा करून क्रीजवर उभे आहेत.

भारताला तिसरा धक्का

भारताला तिसरा धक्का बसला आहे. इशान किशन 50 धावा करून धावबाद झाला. भारताची धावसंख्या आता तीन विकेटवर 224 धावा आहे. शुभमन गिल 97 धावा करून खेळत आहे.

इशान किशनने पूर्ण केले अर्धशतक

इशान किशनने शानदार फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. यामुळे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण झाले आहे. भारताची धावसंख्या 42 षटकांनंतर 2 बाद 224 धावा आहे.

भारताची धावसंख्या 200 पार

भारताची धावसंख्या दोन गडी गमावून 200 धावा ओलांडली आहे. गिल आणि किशन यांच्यात शतकी भागीदारी झाली असून दोन्ही फलंदाज उत्कृष्ट लयीत दिसत आहेत. 41 षटकांनंतर भारताने 2 बाद 218 धावा केल्या.

गिल आणि ईशानची झंझावाती फलंदाजी

टीम इंडियाच्या दोन युवा फलंदाजांनी झिम्बाब्वेला जोरदार तडाखा दिला आहे. शिखर धवनची विकेट पडल्यानंतर इशान किशन आणि शुभमन गिलची फलंदाजी सुरूच आहे. दोघांनी मिळून जवळपास 100 धावा जोडल्या आणि ही धावसंख्या खूप वेगाने पुढे गेली. 37 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा झाली आहे.

IND vs ZIM : शुभमन गिलने पूर्ण केले अर्धशतक

शुभमन गिलने 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत सहा चौकार मारले आहेत. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील चौथे अर्धशतक आहे. यासह भारताची धावसंख्याही दोन गडी गमावून 150 च्या पुढे गेली आहे.

शिखर धवन 40 धावा करून बाद

टीम इंडियाची दुसरी विकेट पडली आहे, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन 40 धावा करून बाद झाला. यासह भारताच्या 84 च्या स्कोअरवर दोन विकेट्स पडल्या आहेत. आता इशान किशन क्रीजवर शुभमन गिलसोबत आहे.

कर्णधार केएल राहुल बाद

टीम इंडियाला पहिला झटका बसला आहे, कर्णधार केएल राहुल अवघ्या 30 धावा करून बाद झाला. भारताची धावसंख्या 15 व्या षटकात 63 धावांवर एक विकेट अशी झाली आहे. कर्णधार केएल राहुलसाठी ही मालिका निराशाजनक ठरली आहे, तीन सामन्यांमध्ये तो केवळ 31 धावा करू शकला आहे.

IND vs ZIM : भारताची धावसंख्या 50 पार

कर्णधार राहुल आणि शिखर धवन या जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असून हळूहळू संघाची धावसंख्या पुढे नेत आहेत. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 52 धावा आहे.

भारताने पॉवरप्लेमध्ये केल्या 41 धावा

पॉवरप्लेमध्ये भारताने 41 धावा केल्या आहेत. लोकेश राहुल आणि शिखर धवन ही जोडी सावधपणे खेळत असून हे दोघेही दीर्घ भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

राहुलने जिंकले नाणेफेक

भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार राहुलने संघात दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या जागी दीपक चहर आणि आवेश खान यांना संधी देण्यात आली आहे.

Web Title: Zimbabwe Vs India 3rd Odi Live Cricket Score Kl Rahul Ruturaj Gaikwad Rahul Tripathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..