

Zimbabwe Vs India Deepak Hooda Creates World Record : भारताने झिम्बाब्वे विरूद्धचा दुसरा वनडे सामना 5 विकेट्सनी जिंकला. भारताने तीन मामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना 22 ऑगस्ट रोजी हरारे येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेने भारतासमोर 162 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना भारताला आपले पाच फलंदाज खर्ची घालावे लागले. अखेर दीपक हुड्डा आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, भारतीय संघात मधल्या फळीत आपली जागा पक्की करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या दीपक हुड्डाने झिम्बाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात एक वर्ल्ड रेकॉर्ड केले. दीपक हुड्डाने पदार्पणानंतर सर्वाधिक सलग सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. दीपकच्या पदार्पणापासून भारतीय संघाने आतापर्यंत सलग 16 सामने जिंकले आहेत. यापूर्वी हे रेकॉर्ड रोमानियाच्या सॅटव्हिक नादीगोटला याच्या नावावर होते. त्याच्या पदार्पणानंतर रोमानियाने सलग 15 सामने जिंकले होते. दीपक हुड्डाने दुसऱ्या वनडे सामन्यात महत्वाच्या 25 धावा आणि एक विकेट देखील घेतली.
दरम्यान, भारताने झिम्बाब्वेचे 162 धावांचा आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत दुसरा वनडे सामना 5 विकेट्सनी जिंकला. झिम्बाब्वेने भारताची अवस्था 4 बाद 97 धावा अशी करून चांगली झुंज दिली होती. मात्र संजू सॅमसन (नाबाद 39) आणि दीपक हुड्डा (25) यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या समिप पोहचवले. भारताकडून शिखर धवन आणि शुभमन गिलने प्रत्येकी 33 धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने 38 धावा देत 3 बळी टिपले. भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
मालिकेतील तिसरा वनडे सामना 22 ऑगस्टला होणार आहे. भारताने मालिका आधीच खिशात टाकली असल्याने तिसऱ्या सामन्यात कर्णधार केएल राहुल बेंचवरील ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद आणि आवेश खान सारख्या युवा खेळाडूंना संधी देणार का हे पहावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.