esakal | हरारे! झिम्बाब्वेसमोर पाकचा खेळ 99 धावांवरच खल्लास

बोलून बातमी शोधा

Zimbabwe vs Pakistan
हरारे! झिम्बाब्वेसमोर पाकचा खेळ 99 धावांवरच खल्लास
sakal_logo
By
टीम ई सकाळ

Zimbabwe vs Pakistan, 2nd T20I : झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला दुसऱ्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हरारेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात झिम्बाब्वेनं 19 धावांनी विजय नोंदवत झिम्बाब्वेच्या संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 11 धावांनी विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड करत यजमानांनी मालिका बरोबरीत आणली असून 25 एप्रिल रोजी हरारेच्या मैदानातील सामना आता निर्णायक ठरणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं पाहुण्या पाकिस्तानसमोर 119 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कमुनुकम्वे आणि कर्णधार ब्रेंडन टेलर यांनी झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 19 धावा असताना फहिम अश्रफने टेलरला तंबूत धाडले. त्याने 5 धावांची खेळी केली. तडिवनाशे मारुमणी याने 19 चेंडूत 13 धावा केल्या. अर्शद इक्बालने त्याची विकेट घेतली. दानिश अझीजने सेट झालेल्या कमुनुकम्वेनं सर्वाधिक 34 धावांची इनिंग खेळली. चकब्वा 18 (14) आणि मुसकंद 13 (10) यांच्याशिवाय तळाच्या फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे निर्धारित 20 षटकात झिम्बाब्वेचा डाव 9 बाद 118 धावांत आटोपला.

हेही वाचा: ICC T20I Rankings : बाबर फार्मात; टी-20 मध्ये विराटच्या दोन पावले पुढेच

या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. मोहम्मद रिझवान 18 चेंडूत 13 धावा करुन चालता झाला. तो बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझमने 45 चेंडूत 41 धावा केल्या. त्याच्याशिवाय दानिश अझीजने 24 चेंडूत 22 धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांनी घोर निराशा केली. त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानच्या संघाला यजमानांनी शंभर धावाही करु दिल्या नाहीत. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पाकिस्तानचा डाव 99 धावांत आटोपला.