esakal | विराट IPL खेळतोय आणि तिकडे बाबर त्याचा रेकॉर्ड मोडतोय

बोलून बातमी शोधा

Babar Azam
विराट IPL खेळतोय आणि तिकडे बाबर त्याचा रेकॉर्ड मोडतोय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

झिम्बाब्वे विरुद्धच्या निर्णायक टी-20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शरजिल खान अवघ्या 18 धावा करुन परतल्यानंतर बाबर आझम बॅटिंगसाठी मैदानात उतरला. त्याने सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या साथीने संघाच्या डावाला आकार दिला. दोघांनी 100 + धावांची भागीदारी केली. या सामन्यात बाबरने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. विराट कोहलीचा विक्रम मोडित काढून तो सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरलाय.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

हेही वाचा: ZIM vs PAK 2nd T20I : ल्यूकनं कोणाची कॉपी केलीये माहितेय (VIDEO)

यापूर्वी बाबर आझमने वनडे रँकिंगमध्ये विराटच्या जागेवर कब्जा केला होता. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला टी-20 क्रमवारीत मागे टाकले होते. बाबरने 52 डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने हा टप्पा गाठण्यासाठी 60 सामन्यातील 56 वेळा बॅटिंगला यावे लागले होते. 3 जूलै 2018 मध्ये मँचेस्टरच्या मैदानात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर 4 सप्टेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने 62 सामन्यातील 62 सामन्यात हा पल्ला सर केला होता. सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ब्रँडम मॅक्युलम तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 67 सामन्यातील 66 डावात हा पराक्रम केला होता.

झिम्बाब्वे विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान संघाने पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने कमबॅक केले. मालिका बरोबरीत असून हरारेच्या मैदानात दोन्ही संघात निर्णायक सामना रंगला आहे. बाबर आजमने या सामन्यात 46 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यात 5 चौकारांचा समावेश होता. त्याचे अर्धशतक आणि सलामीवीर रिझवानच्या नाबाद 91 धावांच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने यजमानांसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.