'मुलांनो, व्हँलेटाईन डे साजरा करण्यात वेळ घालवू नका'

valentine day special dear student do not waste your time in like this day
valentine day special dear student do not waste your time in like this day

पाश्चिमात्त्य राष्ट्रांच्या अनुकरणाने आपल्या देशात विविध  दिवस कृतज्ञता  दिवस म्हणून साजरे  होतात. प्रत्येक डे मागे एक तर्क आणि  इतिहास आहे. अलीकडेच प्रत्येक दिवस हा कोणतातरी " स्पेशल डे" असतोच. जागतिकीकरणामुळे जगभर  या  डेज सेलिब्रेशन चे पेव फुटले आहे. ते इंटरनेट च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत झपाट्याने  पोहचले. ज्याच्या त्याच्या परीने  सर्वजण हे डे एन्जॉय करतात. या सर्व प्रकारच्या  डेज ची युवावर्गाला जास्त भुरळ असते.

या स्पेशल डे चा प्रसार करणेसाठी वृत्तपत्र , सिनेमा, टीव्ही वरील सिरियल्स देखील  मोठी भूमिका पार पiडतात. हल्ली तर  प्रत्येकाकडे  स्मार्ट फोन असल्याने अशा दिवसाचे औचीत्त्य साधून ऑनलाईन  शुभेच्छा चा  सोशल मीडिया वरती पूर येतो. कौटूंबिक,  राजकीय , कामाच्या ठिकाणच्या  अशा सर्व ग्रुप मध्ये विविध ग्रीटिंग्स, अलंकारित  भाषेने नटलेले  मेसेजेस, चित्रे , व्हिडीओ  फॉरवर्ड होतात. तसेच पी आर ( पब्लिक रिलेशन) टिकवणेसाठी सोशल मीडिया च्या मध्यमातून शुभेछयाचा पाऊस पडतो , आणि काही स्मार्ट लोक तर सर्वाना शुभेछया देणेपेक्षा एक स्टेटस ठेऊन मोकळे होतात.

   एकदिवसीय  प्रदर्शन कितपत टिकाऊ आणि व्यावहारिक आहे याची मीमांसा होणे गरजेचे आहे. सेलिब्रेशन च्या नावाखाली  युवावर्गाचा  पैसा, वेळ आणि शक्ती पणाला  लावली जाते . या दरम्यान  विविध प्रकारचे  ग्रीटिंग कार्ड्स, फुले, बुके, महागड्या गिफ्ट्स इंटरनेट सेवा, विविध अँप बनवणाऱ्या आय टी  कम्पन्याचा अप्रत्यक्षपणे व्यवसाय  होत असतो. दिवस हे 'मार्केटिंग स्ट्रॅटेजी'  साठी वापरले जातात. एखाद्या दिवशी आपण नको तितके महत्व देऊन  अमूल्य वेळ , पैसे वाया घालवतो.असे सांगावेसे वाटते. प्रथमदर्शनी हे सेलिब्रेशन समाधानकारक असते. याप्रकारचे डे सेलिब्रेशन सोबतच आपल्या देशात कितीतरी विधायक कामे कारणेसारख्या गोष्टी आहेत त्यातून आपल्या उद्धारासोबतच समाजाचा विकास होऊ शकतो आणि राष्ट्राचे भविष्य घडते. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. 

 युवावर्गाने डे सेलिब्रेशन ना महत्व देताना आपली भारतीय संस्कृती देखील विसरू नये.  परकीय संस्कृतीला आहारी जायचे  की पली सद्सद्विवेक बुद्धी , भारतीय वारसा  वापरून जे योग्य आहे ते करून तरुणाई चा वापर स्वतः आणि समाजाच्या कल्याणासाठी  करायचा  हे ठरवणे काळाची गरज आहे. युवावर्ग हा समाजासाठी  वरदान आहे. त्यांच्यामध्ये देश घडवण्याची ताकत आहे. आपल्या पंतप्रधानांनी बऱ्याचदा नमूद केले आहे की हिंदुस्थान हा तरुणांचा  देश आहे. आपल्या लोकसंख्येतील जास्तीत जास्त  नागरिक युवक आहेत. भारतीय  महापुरुषांनी  खोलवर अभ्यास करून नवीन पिढीतून युवकांसाठी  संपन्न साहित्याचा वारसा ठेवलेला आहे. भगवतगीता, बायबल , कुराण,  दासबोध , इत्यादी मध्ये देखील युवकांना संदेश आहेत.  गतकाळातील   शिकवण आजही लागू आहे त्याचा विसर पडू नये. 

जगभरातील दर्जेदार विद्यापीठामध्ये देखील  भारतीय साहित्य  संदर्भ ग्रंथ म्हणून वापरलं जाते. त्याकडे आपण  कानाडोळा  करून आभासी आणि परकीय संस्कृती मधील डे ना महत्व देणे चुकीचे आहे.  अंधानुकरण किंवा एक फॅशन म्हणून या डे कडे न पाहता , जे श्रेयस आहे आणि सद्सद्विवेक बुद्धीला पटेल  ते केले तर युवाशक्तीचा राष्ट्राच्या उभारणीसाठी उपयोग होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com