Singles Day 2021: आम्हाला नाही करायचं लग्न, नको आहेत पोरं बाळं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Singles Day 2021: आम्हाला नाही करायचं लग्न, नको आहेत पोरं बाळं
Singles Day 2021: आम्हाला नाही करायचं लग्न, नको आहेत पोरं बाळं

Singles Day 2021: आम्हाला नाही करायचं लग्न, नको आहेत पोरं बाळं

11 नोव्हेंबर, डबल 11 किंवा सिंगल्स डे हा बॅचलर डे म्हणून ओळखला जातो. चीनमध्ये या दिवसाला विशेष महत्व आहे. चीनमध्ये या दिवशी अनौपचारिक सुट्टी असते. तसेच सिंगल्ससाठी खरेदीचा हंगाम असतो. हा दिवस रिलेशनशीपमध्ये न अडकलेले पुरूष साजरा करतात. 2011 मध्ये 11 नोव्हेंबर या दिवशी बीजिंगमध्ये 4,000 हून अधिक जोडप्यांनी लग्न केले, जे दररोजच्या सरासरी 700 विवाहांपेक्षा कितीतरी जास्त आहे.

का साजरा केला जातो दिवस- सिंगल डे सेलिब्रेट करण्यासाठी 11-11 ही तारीख निवडली गेली. कारण 1 हा अंक बेअर स्टिक (चीनी पिनयिन) सारखा दिसतो. तो चिनी इंटरनेट सेंग सारखा आहे. म्हणजेच यात अविवाहित पुरुष कुटुंबात शाखा जोडत नाहीत. किंवा कुटुंब पुढे न्यावं असं त्यांना वाटत नाही. यात एकल लोकांच्या लोकसंख्याशास्त्रीय गटाचा संदर्भ देतात. मजा म्हणजे, या दिवशी पुरूष सुट्टी घेऊन एन्जॉय करत एकटे राहणे सेलिब्रेट करतात, शॉपिंग करतात.

असा आहे इतिहास - 1993 मध्ये नानजिंग विद्यापीठात सिंगल्स डे किंवा बॅचलर डेला सुरूवात झाली. 1990 च्या काळात नानजिंगमधील इतर अनेक विद्यापीठातही सिगल्स डे साजरा झाला. हा डे कसा सुरू झाला याविषयी अनेक कल्पना आहेत. नानजिंग युनिव्हर्सिटीच्या वसतीगृहात याविषयी चर्चा झाली होती. 1993मध्ये नानजिंग युनिव्हर्सिटीच्या मिंगकावूझु वसतिगृहातील चार पुरुष विद्यार्थ्यांनी आपण अविवाहित राहून कशी मजा करू शकतो यावर चर्चा केली. एकटे राहणे सेलिब्रिट करण्याचा, उत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणून त्यांनी 11 नोव्हेंबर हा दिवस ठरविला. त्यांच्या या उपक्रमाला विद्यापीठातील मुलांनी चांगलाच पाठींबा दिला. पुढे हा दिवस फक्त विद्यापीठापुरता मर्यादित न राहता चीनच्या अनेक भागात त्याचे प्रस्थ वाढले. सोशल मिडियामुळे त्याचा प्रसार आणखी वाढला. त्यामुळेच की काय समकालीन चीनी संस्कृती आणि समाजात हा दिवस खूपच लोकप्रिय झाला आहे.

हेही वाचा: Relation Breakup होण्याच्या मार्गावर आहे? गर्लफ्रेंडला मनवण्याचे 6 मार्ग

खरेदीचा उत्सव- या दरम्यान सुट्टी असते. तसेच सिगल्ससाठी शॉपिंग फेस्टीवलचे आयोजनही केले जाते. अनेक विमान कंपन्या त्यांच्या भाड्यात सवलत देतात. यात खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे कंपन्यांची उलाढाल काही अब्ज युआन इतकी होते. अलिबाबा ही कंपनी या काळात मोठ्या ऑफर्स देते तसेच विविध संकल्पना राबवून खर्च करते.

loading image
go to top