

build strong relationship,
Sakal
build strong relationship: मजबुत, प्रेमळ, दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचे रहस्य काय आहे ? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण तरीही, अनेकदा काहींना त्यांच्या जोडीदारासोबत आनंदी राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तर, तुमच्या जोडीदारासोबत मजबूत नातं निर्माण करण्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेऊया. १५ ऑक्टोबर रोजी शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम क्लिपमध्ये, ३३ वर्षांहून अधिक अनुभव असलेले न्यूरोसर्जन डॉ. प्रशांत कटाकोल यांनी मजबूत नातेसंबंध निर्माण करण्याचे रहस्य सांगितले. त्यांनी चार स्तंभ सांगितले आहेत ज्यामुळे नातं अधिक घट्ट होईल.