वर्ष संपायच्या आधीच उरकायला हवीत 'ही' आर्थिक कामे; अन्यथा होईल नुकसान

 Money
Moneyesakal

नवी दिल्ली : 2021 हे वर्ष आता संपायला आलं आहे. अवघ्या 15 दिवसांनी 2022 सालचा पहिला दिवस उजाडेल. अर्थात कोणतंही वर्ष संपताना जसं आपण झालं गेलं विसरुन जाऊ, असं म्हणत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आनंदोत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे काही महत्त्वाची कामे देखील उरकून घेत असतो. या कामांमधील महत्त्वाचं काम म्हणजे पैशांशी निगडीत कामे होय. 2021 वर्ष संपायच्या आत या डिसेंबर महिन्यात तुम्ही तातडीने पूर्ण करायला हवीत, अशा महत्त्वाच्या चार कामांविषयीची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

 Money
छोटा राजनचा सहकारी सुरेश पुजारी अटकेत; फिलीपाईन्समधून आणलं भारतात

पीएफ अकाउंटचे नॉमिनी (PF Account Nominee)

जर तुमचे प्रॉव्हीडंट फंडचं अकाउंट असेल तर तुम्ही याबाबतची डेडलाईन अपडेट पाहणं अत्यंत गरजेचं आहे. EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (The Employees' Provident Fund Organisation) सर्व पीएफ खातेधारकांना त्यांचे नॉमिनी ठरवणे आता आवश्यक केलं आहे. नॉमिनी जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ आहे. या तारखेपर्यंत तुम्ही जर पीएफ खात्याला आपले नॉमिनी जोडले नाही तर विम्याचे पैसे आणि पेन्शन यांसारखे फायदे मिळवण्यामध्ये तुम्हाला भरपूर अडचणी येऊ शकतात.

ITR फायलिंगची डेडलाईन (ITR Filing Deadline)

कोरोनाव्हायरस आणि आयटी पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे सरकारने सप्टेंबरमध्ये आर्थिक वर्ष 2021 साठी लोकांकडून प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती. यापूर्वी, अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती. साधारणपणे, वैयक्तिक करदात्यांसाठी ITR (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै असते.

 Money
टाटाचा 7.95 रुपयांचा शेअर पाडतोय पैशांचा पाऊस! वर्षात 2157 टक्के वाढ

पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे (Submission of Life Certificate for pensioners)

निवृत्ती वेतन मंत्रालयाने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 वरुन 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असतं. त्याची/तिची पेन्शन चालू ठेवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असतं. सध्या सुरू असलेल्या कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर आणि वृद्ध लोकसंख्येला कोरोनाचा असलेला धोका पाहून आता मंत्रालयाने सर्व वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठीचा विद्यमान कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सर्व पेन्शनधारक 31 डिसेंबर 2021 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

EPFO ची आधार आणि UAN ची अंतिम मुदत (EPFO's Aadhaar and UAN deadline)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उत्तर पूर्व राज्यातील आस्थापनांसाठी आणि विशिष्ट वर्गाच्या आस्थापनांसाठी UAN आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे. एक परिपत्रक जारी करून EPFO ​​ने म्हटलंय की, आधारसाठी जवळपास चार वर्षांचा पुरेसा वेळ दिल्यानंतर, EPFO ​​ने 01.06.2021 रोजी निर्देश जारी केलेत की, ECR द्वारे योगदान प्राप्त करण्यासाठी UAN आधारचे अपडेट्स लवकरात लवकर भरले जावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com