

5 Easy Yoga Poses for All Ages: Daily Remedies for Kids, Youth, and Seniors
esakal
Yoga for Overall Health and Mindful Living: आजकालच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत स्वतःला निरोगी ठेवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. शाळकरी मुलांपासून ते ऑफिसमध्ये काम करणारे तरुण आणि घरातील वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या शारीरिक किंवा मानसिक समस्येशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत योग हे विनाखर्च शरीर आणि मन दोन्ही मजबूत करणारे सर्वात प्रभावी साधन ठरते.
योग फक्त लवचिक शरीर असणारेच करू शकतात, हा एक गैरसमज आहे. रोजच्या दिनचर्येत ५ सोप्या योगासनांचा समावेश करून प्रत्येक वयातील व्यक्ती आपले आरोग्य उत्तम ठेवू शकते.