esakal | कडक सॅल्युट! रणरणत्या उन्हात गर्भवती डीएसपी बजावतेय कर्तृत्व

बोलून बातमी शोधा

pregnant-dsp-shilpa-sahu-doing-her-duty
कडक सॅल्युट! रणरणत्या उन्हात गर्भवती डीएसपी बजावतेय कर्तृत्व
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही तोच आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. यामध्येच प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सोबतच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनही घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कठीण काळात पोलिस, डॉक्टर आणि इतरेतर कर्मचारी खंबीरपणे या संकटाशी सामना करत आहेत. या कोविड योद्ध्यांमध्येच सध्या छत्तीसगडच्या डीएसपी शिल्पा साहू या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

लॉकडाउनच्या काळात नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन व्हावं यासाठी शिल्पा साहू प्रेग्नंट असतांनादेखील रस्त्यावर उतरल्या आहेत. भर उन्हात उभं राहून त्या त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे सध्या त्या चर्चेत आल्या आहेत.

शिल्पा साहू दंतेवाडाच्या डीएसपी असून त्या ५ महिन्यांच्या गर्भवती आहे. विशेष म्हणजे या कठीण काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत आहेत. प्रत्येक नागरिकाने कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं यासाठी त्या आवाहनदेखील करत आहेत.

हेही वाचा : ये दुरी सही जाए ना! कोरोना काळात गर्लफ्रेंडला भेटायच्या भन्नाट ट्रीक्स

दरम्यान, सोशल मीडियावर शिल्पा साहू चर्चेत आल्या असून त्यांचे फोटो व व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. केवळ इतकंच नाही तर अनेकांनी त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या निर्भीडपणाला दाद देत कौतुक केलं आहे.