Physical Relation | या ५ गोष्टी तुमचे लैंगिक जीवन उद्ध्वस्त करतात; वेळीच लक्ष द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Physical Relation

Physical Relation : या ५ गोष्टी तुमचे लैंगिक जीवन उद्ध्वस्त करतात; वेळीच लक्ष द्या

मुंबई : तुमच्या काही सवयी आणि अविचारीपणामुळे तुमच्या लैंगिक जीवनातील उत्साह कमी होतो. अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊ.

ताणतणाव

जर तुम्ही प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल खूप ताण घेत असाल तर तुमचे लैंगिक जीवन कंटाळवाणे होऊ शकते.

तणाव तुम्हाला कशावरही लक्ष केंद्रित करू देत नाही आणि तुमची कोर्टिसोलची पातळी वाढते. परिणामी टेस्टेस्टेरॉन हार्माेनवर नकारात्मक प्रभाव पडतो. हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार ?

हेही वाचा: Physical Relation : शारीरिक संबंध ठेवताना लठ्ठपणा ठरतोय अडथळा... आता काय कराल ?

अपुरी झोप

झोपेची कमतरता हे सतत थकवा येण्याचे प्रमुख कारण असू शकते. जर तुम्ही जास्त काम करत असाल आणि तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नसेल, तर दिवसाच्या शेवटी तुम्हाला थकवा जाणवेल.

सेक्स तुमच्या आवाक्याबाहेर जाईल. हे टाळण्यासाठी दुपारी विश्रांती घ्या किंवा तुमचा आहार आणि जीवनशैली बदला.

संप्रेरकांचे असंतुलन

तुम्हाला वैद्यकीय समस्या आहे असे वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटू शकता. कदाचित तुमचा जन्म नैसर्गिकरित्या कमी टेस्टोस्टेरॉनसह झाला असेल.

जोडप्यांची रोजची भांडणे

सर्व जोडप्यांमध्ये भांडणे होतात, परंतु कधीकधी याचा परिणाम तुमच्या लैंगिक जीवनावरही होऊ शकतो. जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप भांडत असाल तर याचा तुमच्या लैंगिक जीवनावरही परिणाम होईल हे उघड आहे.

कारण या भांडणामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. यासाठी तुम्हा दोघांनी तुमचा समन्वय आणि समतोल साधून काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून नाते अधिक घट्ट होऊ शकेल.

हेही वाचा: Men's Health : शारीरिक संबंधांमध्ये पुरुषांना येतात या अडचणी; घरीच होतील उपचार

असमाधानकारक संभोग

काही वेळा तुमचा पार्टनर तुम्हाला संतुष्ट करू शकत नाही. यामुळे निराशा होते आणि पुन्हा सेक्स करावेसे वाटत नाही.

तुमच्याबाबतीतही असे होत असेल, तर तुमच्या दोघांसाठी चर्चा करण्याची हीच योग्य वेळ आहे. आपल्याला कधीकधी आपल्या जोडीदाराला अंथरुणावर काय आवडते आणि ते कसे करायचे आहे आणि ते काय चुकीचे करत आहेत हे सांगणे आवश्यक आहे.

जर तुम्ही या गोष्टी शेअर केल्या नाहीत आणि तुमचा पार्टनर ती चूक पुन्हा करत राहील आणि या गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात.