स्टायलिश पद्धतीने डेनिम्स कशी घालावी? जाणून घ्या ५ हटके पद्धती | Denim Style | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Denim

Denim Style: स्टायलिश पद्धतीने डेनिम्स कशी घालावी? जाणून घ्या ५ हटके पद्धती

Ways to Style Denim on Denim : प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये डेनिम्स असायलाच हवी. कारण, जीन्स ही वेगवेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आणि वापरण्यास सोपी आहे. जीन्स अगदी साधी असली तरीही काही लोक या साध्या कपड्याला इतके मोहक बनवतात की ते आपल्याला आकर्षक वाटते. थोडक्यात काय तर साधी डेनिम्स तुम्ही कशाप्रकारे घालता हे पण महत्वाचे आहे.

डेनिम्स विविध रंग, आकार आणि स्टाईल मध्ये येते. कॅज्युअल लूकसाठी तुमच्या आवडत्या डेनिमला ग्राफिक टी-शर्ट सोबत घालू शकता. जीन्स कोणत्याही प्रसंगासाठी योग्य कशी ड्रेस अप करायची याची कल्पकता असणं आवश्यक आहे. जीन्सचा वापर तुम्ही कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत... कोठेही करू शकता. जीन्सला वेगवेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे घालू शकता, त्याबाबत जाणून घ्या.

हेही वाचा: Flashback 2022 :यंदाचं वर्ष फॅशनउद्योगासाठी कसं होतं?

१. डेनिम वर डेनिम

डेनिम-ऑन-डेनिम लूक नक्की ट्राय करा. तुम्ही वर आणि खाली समान रंगाची शेड घातली असेल, तर अ‍ॅक्सेसरीज आणि लेयरिंगच्या तुकड्यांसह एकसंधपणा तोडण्याची खात्री करा. गडद निळ्या रंगाची जीन्स तपकिरी पेअर-ऑनसह सर्वोत्तम दिसतात. डेनिमसह रेशीम स्कार्फ देखील लूकला आकर्षक बनवतो.

२. कॅज्युअल रिप्ड जीन्स

चिक ब्लेझरला तुम्ही जीन्ससोबत परिधान करू शकता. ब्लेझर तुमच्या लूकला आकर्षक बनवतो. चकचकीत टॉप आणि हिल सह कोणत्याही फिट रिप्ड जीन्सला तुम्ही घालू शकता. तसेच, बाइक जॅकेट आणि डेनिम कॅज्युअल रिप्ड जीन्स कॉम्बिनेशन देखील चांगले आहे.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

३. सिल्क टॉपसह तुमची जीन्स ड्रेस अप करा

जीन्स कोणत्याही वेळी घालण्यास सर्वोत्तम आहे. जीन्ससोहत सिल्क टॉप देखील चांगले कॉम्बिनेशन आहे. पार्टीपासून ते ऑफिस मीटिंगपर्यंत तुम्ही प्रत्येक ठिकाणी या लूकमध्ये जाऊ शकता.

४. इंडो-वेस्टर्न क्विर्क

कुर्ती-जीन्सचा ट्रेंड लोकप्रिय असला तरी, जीन्सला भारतीय ट्विस्ट देण्याचे अनेक मार्ग आहेत. कौटुंबिक कार्यक्रमात तुम्ही स्कीनी जीन्स आणि दागिन्यांसह तुमचा आवडता ड्रेस घालू शकता. तुम्हाला जर हटके लूक हवा असल्यास सिल्क टॉपसह प्रिंटेड श्रग घाला. जीन्सवर स्ट्रॅपी मॅक्सी ड्रेस देखील ट्राय करा.

५. डेनिम स्कर्ट अपग्रेड करा

हटके लूकसाठी तुम्ही डेनिम स्कर्ट देखील ट्राय करू शकता. तसेच, मोठ्या आकाराच्या शर्टसह क्लासिक 'borrowed-from-the-boyfriend' लुक अनेकजण ट्राय करतात. यासोबत तुम्ही हाय-हिल्सचे शूज घालू शकता.

हेही वाचा: Flashback 2022 : या सरत्या वर्षामध्ये कसं होतं देशाचं आरोग्य?

टॅग्स :jeansdenimclothes