esakal | रिलेशनशिपमधून ब्रेक घेताय? त्याआधी 7 गोष्टींचा विचार करा
sakal

बोलून बातमी शोधा

रिलेशनशिपमधून ब्रेक घेताय? त्याआधी 7 गोष्टींचा विचार करा

रिलेशनशिपमधून ब्रेक घेताय? त्याआधी 7 गोष्टींचा विचार करा

sakal_logo
By
शरयू काकडे

एखाद नातं जेव्हा जुळतं तेव्हा सुरुवातीचा काही काळ नात्यातील सर्वांत सुंदर असतो. पण काही काळानंतर नात्यामध्ये तोच तोच पणा येतो. एकमेकांना गृहित धरणे, नात्याला हवा तितका वेळ न देणे, नात टिकविण्यासाठी अपेक्षित प्रयत्न न करणे, सतत कामात बिझी असणे अशा गोष्टींमुळे एकमेकांमध्ये दुरावा येतो. अशावेळी नात्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळावा आणि एकमेकांबाबत काय वाटते याबाबत स्पष्टता यावी, यासाठी कित्येक जोडपे(कपल) एकेमकांपासून थोडा ब्रेक घेतात. नात्यामध्ये जेव्हा अशी वेळ येते तेव्हा थोडा विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही तुमच्या नात्यामधून असा ब्रेक घेत असाल तर या 7 गोष्टींचा नक्की विचार करा.(7 Guidelines To Take A Break From Your Relationship)

तारीख ठरवा

जेव्हा एखादे जोडपे नात्यामध्ये ब्रेक घेते तेव्हा वेळ हा खूप महत्वाता मुद्दा ठरतो. थेरपिस्टच्या सल्ल्यानुसार, नात्यांबाबत पुर्नविचार करण्यासाठी आणि विचारांमध्ये स्पष्टता येण्यासाठी 4-6 आठवडे दोघांसाठी पुरेसे आहेत. या वेळात तुम्ही जे आहे ते स्विकारुन त्यावर उपाय शोधू शकता.

प्रत्येक व्यक्तीसाठी ब्रेकची संकलप्ना वेगळी असते

तुम्ही मनात नात्यातील ब्रेक कसा असेल अशी कल्पना केली असेल तर पुढे जाऊन येणाऱ्या (सरप्राईजिंग) अनपेक्षित परिस्थिला सामोरे जावे लागेल. तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्ही आणि तुमचा जोडीदार ठरवू शकता. कदाचित, तुमच्या मते एकमेकांना थोडी स्पेस देण्यासाठी विकएन्डला न भेटणे पुरेसे असू शकते. त्यामुळे एकमेकांच्या मनातील ब्रेकची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

ब्रेक घेताना काही मर्यादा ठरवा

ब्रेक घेताना काही मर्यादा ठरल्यामुळे तुमच्यामध्ये वाद आणि गैरसमज होणार नाही. कदाचित, तुम्ही आठवड्यातून एकदा एक थेरपिस्ट भेट द्याल किंवा आपण एकमेकांना अजिबात भेटणार नाही - अशा अपेक्षांना आधीच निर्णय घेतल्यास धक्का बसेल. त्यामुळे एकमेकांसोबत बोलून मर्यादा ठरवा.

ब्रेक घेतल्यानंतर काय करणार याबाबत चर्चा?

ब्रेक घेतल्यानंतर काय करणार याबाबत चर्चा? ब्रेक घेतल्यानंतर कोणाला भेटणार? ब्रेक घेण्याआधी प्रश्न एकेमेकांना असे विचारा आणि त्यावर चर्चा करा. तुमच्यामध्ये जर त्यावरुन मतभेद असतील तर ब्रेक संपल्यानंतर एकमेकांवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो.

ब्रेक बाबत कोणाला माहिती असले पाहिजे हे आधीच ठरवा.

तुम्ही ब्रेक घेत आहेत हे तुम्ही तुमच्या मित्र, कुटुंब आणि मुलांना सांगणार आहात की नाही हे आधीच ठरवा. दोघांनीही स्पष्ट बोलून घ्या. तुम्हाला जर तुमचा ब्रेक खासगी ठेवायचा असेल तरी चालेल पण, हे दोघांनी एकमेकांशी बोलून ठरवा.

ब्रेक घेतल्यानंतर अॅक्टिव्ह राहा

निसर्गाच्या सपर्कांत राहाल आशा अॅक्टीव्हिटीमध्ये सहभाग घ्या ज्यामुळे तुमच्या हरवलेल्या व्यक्तीमत्वाशी पुन्हा नव्याने ओळख होईल. तुम्हा तुमच्या आयुष्यातून काय गमावत आहात हे शोधल्यास हा ब्रेक तुमच्यासाठी चांगला ठरेल. पेंटिंग, पॉटरी, स्पोर्ट, कुकिंग तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी आवर्जून करा.

तुमच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांबाबत पुन्हा एकदा विचार करा

ब्रेक घेताना तुम्ही तुमच्या जोडीकरांकडून वैध आणि शक्य असतील अशाच अपेक्षा ठेवा. कित्येकदा भुतकाळातील नात्यांमध्ये पुर्ण न झालेल्या अपेक्षा एकमेकांकडे करत असल्यची जाणीव काही जोडप्यांना झाली आहे. तुम्ही तुमच्या वर्तमानकाळातील जोडीदाराकडून अशा अपेक्षा ठेवणे योग्य नाही.

loading image
go to top