
Millets Health Benefits:
Sakal
मिलेट्स हे पोषणमूल्यांनी समृद्ध असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहेत. मिलेट्समध्ये असलेले झिंक, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. मिलेट्सचे आरोग्यदायी फायदे कोणते हे जाणून घेऊया.
Millets Health Benefits: भारतीय खाद्यसंस्कृतीत एकेकाळी ज्वारी, बाजरी, नाचणी, कंगणी (राळा), कोदरा (हरीक), वरई यांसारख्या मिलेट्सचे प्राबल्य होते. जीवनशैलीतील बदल, फास्ट-फूड संस्कृती आणि पॉलिश केलेल्या तांदूळ-गव्हाच्या वापरामुळे हे धान्य मागे पडले. पण आज पुन्हा एकदा मिलेट्सकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे. कारण हे धान्य पोषणमूल्यांनी समृद्ध, पचायला सोपे आणि कोणत्याही वयोगटासाठी उपयुक्त आहेत. चला पाहूया मिलेट्सचे असे सात फायदे, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी आरोग्यदायी ठरतात.