esakal | ७ प्राण्यांचं जीवन धोक्यात; नामशेष होतायेत प्रजाती

बोलून बातमी शोधा

७ प्राण्यांचं जीवन धोक्यात;  नामशेष होतायेत प्रजाती

७ प्राण्यांचं जीवन धोक्यात; नामशेष होतायेत प्रजाती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सजीवसृष्टी असलेला पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे. त्यामुळे पृथ्वीवर मानवाप्रमाणेच प्राणी,पक्षीदेखील पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं ज्यावेळी पृथ्वीवर सजीव निर्माण झाले त्यावेळी या पृथ्वीचं स्वरुप पूर्णपणे वेगळं होतं. कारण, सुरुवातीच्या काळात येथे. डायनोसॉरससारखे महाकाय जीव होते. त्यानंतर भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे काही जीव नष्ट झाले. तर, काही नामशेष झाले. विशेष म्हणजे सध्याच्या काळातदेखील असेच काही प्राणी आहेत जे नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. काही अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे नामशेष होत असलेले हे प्राणी कोणते ते पाहुयात.

१. आयव्हरी गल (Ivory Gull) -

आयव्हरी गल हा आर्टिक पक्षी असून तो ग्रीनलँड व कॅनडा येथील समुद्रतटावर आढळून येतो. वातावरणातील बदलांमुळे हळूहळू बर्फ वितळत चालला असून त्यामुळे या पक्षांचं जीवन धोक्यात आलं आहे. बर्फ वितळत असल्यामुळे येथे असलेले फिन मासे व सी शेल्सदेखील नष्ट होत आहेत आणि हेच लहान जीव आयव्हरी गल यांचं मुख्य खाद्य आहे. त्यामुळे वातावरणातील बदल आणि अपूर्ण खाद्य यामुळे हे पक्षी नामशेष होत आहेत.

२.हिमबिबट्या (Snow leopard) -

हिमबिबट्या खासकरुन नेपाळ, तेबेट व हिमालय यांच्या उंच पर्वतरांगांवर आढळून येतो. हिमससे हे या हिमबिबट्यांचं मुख्य खाद्य आहे. परंतु, हिमससेदेखील नष्ट होत आहेत. त्यामुळे खाद्याचा अभाव व तापमान वाढ यामुळे हिमबिबट्यांची प्रजाती धोक्यात आली आहे.

३. पाणघोडा (Hippopotamus) -

पाणघोडा नेमका कसा दिसतो हे सगळ्यांनाच ठावूक आहे. कारण, लहानपणापासून अनेक कार्टूनमध्ये आपण त्याला पाहिलं आहे. परंतु, पाणघोड्याची ही प्रजाती नष्ट होऊ लागली आहे. बदलत्या वातावरणामुळे जलस्त्रोत आटत असून पाणघोडे खात असलेली वनस्पतीदेखील नष्ट होत आहे. त्यामुळे परिणामी, पाणघोडे नष्ट होत आहेत.

४. रेड पांडा (Red Panda) -

हत्तीप्रमाणेच रेड पांडादेखील पूर्णपणे शाकाहारी आहे. याला लेसर पांडा किंवा रेड बिअर कॅट असंही म्हटलं जातं. बांबूच्या वनात अधिवास असलेला रेड पांडा आता नामशेष होत आहे. कारण, बांबूची वने कमी झाली आहेत. त्यामुळे हा पांडादेखील हळूहळू लुप्त होत आहे.

हेही वाचा: माणुसकी महत्त्वाची; रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने तोडला रोजा

५. निळा देवमासा (Blue whale) -

अत्यंत दुर्मिळ होत असलेला समुद्री जीव म्हणजे निळा देवमासा. दिवसेंदिवस हा मासा नष्ट होत असून त्याला पाहणं आता दुर्मिळ झालं आहे. निळा देवमाशाची १८८ डेसिबल आवाजाची क्षमता आहे. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा मासा नष्ट होत आहे.

६. ओरँगउटान (Orangutan) -

दक्षिण-पूर्व आशियातील सुमात्रा व जावा बेटांवर ओरँगउटान यांचं वास्तव्य असून वाढत्या तापमानाचा परिणाम या जीवांवर होत आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक वणवे लागत असल्यामुळे या ओरँगउटानचा मुख्य खाद्यस्त्रोत नष्ट होत आहे. त्यामुळे ये प्राणीदेखील अन्नाच्या अभावामुळे नामशेष होत आहेत.

७. गालापागोज पेंग्विन (Galapagos penguin ) -

गालापागोल पेंग्विन ही प्राजातीदेखील दिवसेंदिवस नष्ट होत चालली आहे. समुद्राच्या पाण्यातील वाढत्या आम्लतेमुळे सामुद्रीक जीवसाखळीच धोक्यात आल्यामुळे त्याचा परिणाम या पेंग्विनवरही होत आहे.