
महिमा म्हात्रे आणि ध्रुव म्हात्रे
अभिनयाच्या जगात आपल्या सहज अभिनयाने ओळख निर्माण करणारी महिमा म्हात्रे आज प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारत तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिच्या यशाच्या प्रवासात जो साथीदार कायम सोबत आहे, तो म्हणजे तिचा लहान भाऊ – ध्रुव म्हात्रे. केवळ बहीण-भावाचं नातं असं नव्हे, तर जिवाभावाची मैत्री असलेल्या या जोडीनं एकमेकांविषयी मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.