आईशीच हितगुज सारे!

आईच्या मौन त्यागाची जाणीव मोठेपणी झाल्यानंतर तिचं माझ्या आयुष्यातील स्थान अधिक खोलवर समजलं – ती माझी पहिली मैत्रीण, गुरू आणि खरं प्रेरणास्थान होती.
Mother Daughter Bond
Mother Daughter Bond Sakal
Updated on

स्वाती देवल - अभिनेत्री

'मी आधीची स्वाती भट-कडवाडकर. ‘कडवाडकर’ हे आडनाव लहानपणी मला फार विचित्र वाटायचं. नंतर कळलं, की आमचं मूळ गाव कारवारजवळचं कडवाड आहे. तिथूनच हे आडनाव आलं. आईला मी नेहमी विचारायचे, ‘‘अगं, तू याच नावाच्या माणसाशी लग्न का केलंस?’’ इथून आमच्या गप्पांना सुरुवात व्हायची! माझ्या आयुष्यातली पहिली स्त्री आणि खरी मैत्रीण म्हणजे माझी आई कांचन. ती माझ्यासाठी आई, बहीण, सखी आणि गुरू आहे. तिच्याशिवाय माझं बालपण म्हणजे अपूर्ण चित्र!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com