- विजया बाबर, अभिनेत्री
आपण घरी येतो तेव्हा आई कुठे दिसली नाही की, आपल्याला कसंतरी होतं. आपला जीव कासावीस होतो. घरी आल्यानंतर समोर आई हवीच असते. फक्त आईचा चेहरा बघितला, की आपण शांत होतो. दिवसभरातलं कामाचं टेन्शन, जगातल्या इतर सगळ्या गोष्टींचा ताण फक्त आईकडे बघितलं तरी शांत होतात. आधार असल्यासारखा वाटतो. यासाठीच आई महत्त्वाची आहे. तिचा सहवासच माझ्यासाठी सगळं आहे. घरी गेल्यावर आईचा चेहरा बघितला, की जगात सगळं सुरळीत सुरू आहे, असं वाटतं.