आई ही प्रत्येकासाठीच विशेष असते. मात्र माझ्यासाठी ती केवळ आई नाही, तर माझं संपूर्ण जग आहे. जीवनात अनेक भूमिका लोक निभावतात. काही आपले मार्गदर्शक होतात, काही सोबती, पण आई ही एकमेव व्यक्ती असते, जी प्रत्येक टप्प्यावर निःस्वार्थपणे आपल्या पाठीशी उभी असते. लग्नानंतर खूप काही बदलतं.