Aajicha batwa : ताप आलाय? मग ‘हे’ घरगुती उपाय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajicha batwa fever

Aajicha batwa : ताप आलाय? मग ‘हे’ घरगुती उपाय करा

fever: महाराष्ट्रात हळूहळू आता थंडीचा जोर वाढतो आहे. या थंडीमुळे सर्दी खोकला आणि त्यानंतर ताप येतो. हवामानबदलामुळे हिवाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तापाचा त्रास जाणवतो. अशावेळी डॉक्टरांकडे जाणे हा उपाय तर असतोच पण त्याचवेळी काही घरगुती उपाय करुन पाहिल्यास शरीराचे वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते. आजच्या लेखात असे कोणते घरगुती उपाय याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सकस योग्य आहारातून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यामुळे तापही लवकर बरा होऊ शकतो.

1) तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो

2) हिवाळ्यात बारीक थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा हातावर बारीक चोळून खाल्लास शरीरातील थंडीचा जोर कमी होतो आणि शरीरातुन प्रचंड घाम बाहेर पडून ताप उतरण्यास मदत होते.

3) जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून उकळून हा काढा दिवसातून दोन वेळा घेतल्याने सुध्दा तुमच्या शरीरातील ताप कमी होतो.

हेही वाचा: Winter Recipe: पौष्टिक बीटरुटचे लाडू कसे तयार करायचे?

4) हिवाळ्यात जर ताप आला तर कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं स्वच्छ धुवून टाकावी. नंतर हे पाणी 5 ते 10 मिनिटे चांगले उकळू द्यावे. आणि नंतर ते गाळून दिवसातून दोनदा प्यावे. तापेसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.

5) ताप आल्यास दिवसातून दोन ते तिन वेळा बेलफळाचं चूर्ण कोमट पाण्यात घालून घेतल्याने देखील ताप उतरतो.

6) ताप आल्यावर ती कमी करण्यासाठी मनुके खाणे उपयुक्त असते. 20 ते 25 मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण सकाळी प्यावे.

हेही वाचा: आजीचा बटवा: आयुर्वेदिक औषधी जायफळाचे काय आहेत फायदे?

7) पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये चार ते पाच मेथी दाणे आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.

8) धण्याची चहा- धण्यात असलेले अँटिबायोटिक तत्त्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धण्याच्या बिया शरीराला विटामीन देतात. पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा.

9) तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यासोबत संत्र्यांचा रस घेतल्यानेही तापावर आराम मिळतो. रुग्णाच्या शरीरावर, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. जोवर शरीराचं तापमान कमी होत नाही तोवर  हे सुरू ठेवावं.  दर सहा तासांनंतर पॅरासिटेमॉलची (क्रोसीन किंवा तत्सम कुठलीही जेनेरिक गोळी) एक गोळी द्यावी. तरीही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

10) खास करून हिवाळ्यात आहारात सफरचंद, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते.

टिप-  ताप 102 किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपचार करूनही ताप कमी करता येऊ शकतो.