
अभिजित खांडकेकर आणि शर्मिला शिंदे
‘मैत्री’ ही अनेकदा अनपेक्षित वेळी आणि ठिकाणी उगम पावते. अभिजित खांडकेकर आणि शर्मिला शिंदे यांच्या रेशीमगाठीसारख्या मैत्रीची सुरुवातही अगदी अशीच एका मालिकेच्या सेटवर झाली. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेमुळे एकत्र आलेले हे दोन कलाकार आज एकमेकांच्या आयुष्यात खास स्थान मिळवून आहेत. अभिनयाच्या दुनियेत अनेकजण भेटतात, कामं होतात; पण काहीजणांच्या सहवासात अशी उबदार मैत्री निर्माण होते, की ती आपल्याला कायम लक्षात राहते.