आपण प्रत्येक प्रसंगानुसार योग्य कपडे तर निवडतो; पण ॲक्सेसरीजकडे तितकंसं लक्ष देत नाही. कधी आपण त्या घालायलाच विसरतो, तर कधी त्या कशा आणि किती घालायच्या याबाबत गोंधळात पडतो. .अनेकांना प्रसंगानुरूप योग्य ॲक्सेसरीज कुठल्या, त्या कशा वापरायच्या त्याच्याबद्दलचे काही नियम, कोणत्या प्रसंगाला कोणत्या ॲक्सेसरी शोभतील हेच नीट ठाऊक नसल्यामुळे अनेकदा आपला लूक अपूर्ण राहतो. खरं म्हणजे एक छोटीशी गोष्ट- मग ते ब्रेसलेट असो, घड्याळ असो, कानातलं, पर्स किंवा टाय तुमचा संपूर्ण लोक बदलू शकतो. म्हणूनच म्हणतात, ‘ॲक्सेसरीज कॅन मेक ऑर ब्रेक युअर लूक’ म्हणजेच योग्य ॲक्सेसरीज तुमचा पोशाख उठावदार आणि व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवतात, तर चुकीची निवड तुमचा संपूर्ण लूक विस्कळित करू शकते. ॲक्सेसरीज वापरण्याचे काही नियम एकाच वेळी अनेक ॲक्सेसरीज घालणं टाळा. .निवडक दोन किंवा तीन गोष्टींनी तुमचा लूक पूर्ण करा. कारण ॲक्सेसरी वापरतानाचा पहिला नियम म्हणजे ‘लेस इस मोर’. तुम्ही निवडलेल्या ॲक्सेसरीजमध्ये संतुलन असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच मोठ्या कानातल्यांबरोबर छोटासाफॅशन नव्हे, तुमच्या स्टाइलची भाषानेकलेस घाला आणि या उलट मोठ्या नेकलेसबरोबर छोटे कानातले घाला. ज्यामुळे तुमचा संपूर्ण लूक संतुलित वाटेल.  ॲक्सेसरीज निवडताना प्रसंगाचे भान ठेवा. सणासुदीला किंवा पार्टीजमध्ये मोठं किंवा ठळक ॲक्सेसरीज घालणं शोभून दिसू शकतं; परंतु ऑफिस लूक मात्र मिनिमल ठेवा.  ॲक्सेसरीज निवडताना त्यांच्या रंग संतुलनाचा विचार करा..तिचा रंग तुमच्या कपड्यांशी जुळवा.  स्वच्छ आणि योग्य स्थितीतील ॲक्सेसरीज वापरा. तुटक्या, रंग उडालेल्या, फिक्या पडलेल्या गोष्टी वापरणं टाळा- कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो.अॅक्सेसरीज :व्यावसायिकांच्या योग्य प्रतिमेसाठी आजच्या व्यावसायिक जगात व्यक्तिमत्व आणि प्रेझेंटेशन या दोन्ही गोष्टींचं महत्त्व खूप वाढलं आहे, कपड्यांइतकाच ॲक्सेसरीजचा योग्य वापर करून तुम्ही तुमची व्यावसायिक प्रतिमा निर्माण करू शकता. योग्य ॲक्सेसरीज तुम्हाला आत्मविश्वासही देतात आणि तुमचा लूक प्रदर्शनीय आणि वेल पुट-टुगेदर दिसतो. ऑफिसमध्ये खूप चमकदार, भडक ठळक मोठे किंवा लक्ष वेधून घेणाऱ्या ॲक्सेसरीज टाळाव्यात. .नाजूक आणि मिनिमम ॲक्सेसरीज- मोत्याचे किंवा सोन्याचे अथवा चांदीचं छोटंसं कानातलं, एखादी पातळ चेन किंवा नाजूक ब्रेसलेट कामाच्या ठिकाणी सभ्य आणि प्रोफेशनल दिसतं. कामाच्या ठिकाणी घड्याळाचा वापर नक्की करा. एखादं साधं क्लासिक आणि चांगल्या प्रतीचं घड्याळ निवडा हॅंडबॅग निवडताना न्यूट्रल टोनमधली, चांगल्या प्रतीची मध्यम आकाराची आणि विशेष लक्ष वेधून न घेणारी निवडा..Fashion Tips : कंफर्टशिवाय फॅशन अपुरी! स्टायलिश दिसण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.कामाच्या ठिकाणी ॲक्सेसरीजचा वापर करताना खूप विरोधाभासी रंग टाळा. तुमच्या ॲक्सेसरीजचा रंग कपड्यांच्या टोनशी जुळवा. या सर्व छोट्या वाटणाऱ्या गोष्टी ‘अटेंशन टू डिटेल’ दाखवतात - जे व्यावसायिक प्रतिमेमध्ये खूप महत्त्वाचं असतं. नीटनेटकेपणा, विचारपूर्वक निवड आणि आत्मविश्वास यामुळेच तुमचं व्यक्तिमत्त्व खुलून येतं. ॲक्सेसरीज म्हणजे केवळ फॅशन नाही, तर ती आपल्या शैली आणि विचारसरणीची भाषा आहे. आपण कोणत्या प्रकारे स्वतःला सादर करतो, किती विचारपूर्वक गोष्टी निवडतो आणि त्या किती आत्मविश्वासानं वापरतो हे सर्व या छोट्या तपशीलांमधून दिसून येतं. त्यामुळे ॲक्सेसरीज निवडताना सजग राहा - कारण ती फक्त एक सजावट नसून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंतिम स्पर्श आहे.