तुम्हीही कधीतरीच दारु पिता? मग आरोग्यासंबंधी ही बातमी एकदा वाचाच

तुम्हीही कधीतरीच दारु पिता? मग आरोग्यासंबंधी ही बातमी एकदा वाचाच

आपल्या सर्वांना माहित आहेच की, जास्त मद्यपान (alcohol drinking) करणे हे आपल्यासाठी वाईट आहे. पण आठवड्यातून फक्त काही ठरलेले ग्लास इतकीच दारु पिण्याबद्दल काय? रेड वाईनमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, असे आपल्या सगळ्यांना सांगण्यात आले आहे, त्यामुळे आठवड्यातून दारुचे काही ग्लास पिणे तुमच्यासाठी चांगले आहेत असे म्हटले जाते. पण हे खरंच असं आहे का? या बद्दल युके मध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

कमी ते मध्यम प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जे पूर्णपणे मद्यपान टाळतात त्यांच्या पैक्षा कमी असते. परंतु युनायटेड किंगडम(UK) मधील नागरिकांच्या मोठ्या गटावर केलेल्या आभ्यासातून असे समोर आले आहे की, कधीतरी दारु पिणे आरोग्यासाठी चांगले असते, हा सर्वसामान्यपणे काढलेला निष्कर्ष अचूक नाहीये

यूकेमध्ये दरआठवड्यासाठी सध्या शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी मद्य घेतल्याने देखील लोकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या वाढण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी (ARU)चे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिजिओलॉजिस्ट रुडॉल्फ शुटे ( Rudolph Schutte) म्हणतात की, कमी ते मध्यम अल्कोहोल सेवनामुळे आरोग्यास फायदे होतात असे सांगणे, हे सर्वात मोठा मिथक आहे. कारण यातून आपल्याला मद्यपान हे आपल्यासाठी चांगले असल्याचे सांगीतले गेले आहे.

एआरयू आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांच्या टीमने सुचवले की, सध्या मद्यपान न करणारे लोक त्यांच्या सध्याच्या खराब आरोग्यामुळे मद्यपान करत नाहीत आणि म्हणून जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येतो किंवा इतर कोरोनरी समस्या येतात तेव्हा त्यांच्या न पिण्याशी त्याचा संबंध नाही असे सांगतात, आणि पुढे कमी किंवा मध्यम प्रमाणात अल्कोहोल पिणे हे चांगले असते असे सुचवतात.

संशोधकांनी यूके बायोबँकचा डेटाचा आभ्यास केला ज्यामध्ये तब्बल 333,259 अल्कोहोल पिणारे आणि 21,710 लोक होते ज्यांनी कधीही मद्यपान केले नाही. त्यांनी जवळजवळ सात वर्षांच्या डेटाचे विश्लेषण केले, सहभागींपैकी कोणाला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, हृदयरोग किंवा सेरेब्रोव्हस्कुलर आजार केव्हा होता ते नोट करण्यात आले

तुम्हीही कधीतरीच दारु पिता? मग आरोग्यासंबंधी ही बातमी एकदा वाचाच
जनतेच्या मानसिक आरोग्याची सरकार घेणार काळजी; 'टेलिमेन्टल हेल्थ'ची घोषणा

यामध्ये पूर्वी मद्यपान करणार्‍यांना वगळण्यात आले आणि ज्यांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य समस्येमुळे मद्यपान करणे बंद केलेल्या लोकांचा डेटा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. असे असूनही, कधीही मद्यपान न करणारे जास्त वृद्ध होते, त्यांचा बीएमआय जास्त होता आणि त्यांना उच्च रक्तदाब होता तसेच ते मद्यपान करणाऱ्या लोकांपेक्षा कमी शारीरिक अॅक्टिव्ह होते.

या गटात, कधीही मद्यपान न करणारे जास्त वयस्कर होते, शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय होते, त्यांचा बॉडी मास इंडेक्स जास्त होता आणि ते सामाजिक आर्थिकदृष्ट्या कमी श्रीमंत होते, असे सांगण्यात आले. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोका असलेले घटकांशी जुळवून घेतल्यानंतरही, कधीही मद्यपान करणार्‍यांना एकूण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी त्रास, इस्केमिक हृदयरोग किंवा सेरेब्रोव्हस्कुलर रोग होण्याचा धोका 31, 51 आणि 46 टक्के जास्त होता. त्यामुळे, हे गोंधळात टाकणारे घटक काढून टाकण्यासाठी, संशोधकांनी नंतर सर्वात कमी मद्यपान करणार्‍यांची तुलना जास्त मद्यपान करणाऱ्यांशी केली.

त्यामध्ये असे आढळले की वाइन ही इस्केमिक हृदयरोगापासून खूप कमी संरंक्षण देते, परंतु इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांशी त्याचा काही संबंधित नाहीये असे समोर आले.

तुम्हीही कधीतरीच दारु पिता? मग आरोग्यासंबंधी ही बातमी एकदा वाचाच
56 दिवसांचे Jio, Airtel आणि Vi चे रिचार्ज प्लॅन, पाहा किंमत-फायदे

बिअर आणि स्पिरिट्स सारख्या इतर अल्कोहोलिक पेयांसाठी, अगदी दर आठवड्याला 14 युनिट्सपेक्षा कमी पिणाऱ्या लोकांसाठी, जी यूकेच्या आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांमध्ये साप्ताहिक ड्रिंक्ससाठी शिफारस केलेले प्रमाण आहे, याचे परिणाम खूपच वाईट दिसून आले आहेत

"विशेषतः बिअर, सायडर आणि स्पिरिट्स पिणार्‍यांमध्ये, आठवड्यातून 14 युनिट्सपेक्षा कमी पिणार्‍यांमध्ये देखील हृदय किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या रोगांमुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका वाढतो,असे शुट म्हणतात. आपण वाईन पिणार्‍यांना कोरोनरी आर्टरी रोगाचा धोका कमी असल्याबद्दल बरेच काही ऐकलेले असते, आमचा डेटा दर्शवितो की त्यांच्या इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच जगभरातील मृत्यू आणि रोगांमध्ये अल्कोहोल हे प्रमुख कारणांपैकी एक आहे असे इतर अभ्यासांनुसार उघड झाले आहे.

तुम्हीही कधीतरीच दारु पिता? मग आरोग्यासंबंधी ही बातमी एकदा वाचाच
50MP कॅमेरा असलेल्या 5G फोनवर 4 हजारापर्यंत सूट, पाहा खास ऑफर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com