चला म्हणा, ‘चला चांगलं बोलूया’, अभिनेते सरदेशपांडे यांनी दिला मुलांना कानमंत्र

चांगला अभिनय करण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी चांगला सराव म्हणजे प्रत्येकाने आरशासमोर आत्मविश्वासाने स्वतःचाच परिचय स्वतःला करून द्यायला शिकावं
taught children to communicate with confidence
taught children to communicate with confidenceSakal

‘चांगला अभिनय करण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी चांगला सराव म्हणजे प्रत्येकाने आरशासमोर आत्मविश्वासाने स्वतःचाच परिचय स्वतःला करून द्यायला शिकावं. आपण कोण आहोत हे आरसा चांगल्याप्रकारे दाखवून देतो.

म्हणून आरशाच्या प्रतिबिंबासमोर म्हणा ‘चला चांगलं बोलूया’. आपल्या प्रतिबिंबासमोर तुम्ही उत्कृष्ट बोलू लागलात की, रंगमंचावर आत्मविश्वासानं संवाद बोलू लागाल’, असा कानमंत्र प्रसिद्ध सिने अभिनेते, लेखक धनंजय सरदेशपांडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सिडको एन-२ मधील चाटे स्कूलमध्ये झालेल्या ‘चला चांगलं बोलूया’ या कार्यशाळेत त्यांनी स्वतः अभिनय करून दाखवित मुलांकडूनही प्रात्यक्षिक करून घेतले.

बी बॉझिटिव्ह फाऊंडेशन आणि श्रीराम म्युझिकल फाऊंडेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून शहरातील शाळकरी मुलांसाठी ‘चला चांगलं बोलूया’ ही बालनाट्य कार्यशाळा शनिवारी (१८ मे) घेण्यात आली. या कार्यशाळेत वेगवेगळ्या शाळेतील ४४ मुले सहभागी झाली होती.

आरसाच बनला पात्र

ही कार्यशाळा झाली त्या चाटे स्कूलच्या हॉलमध्ये प्रचंड मोठे आरसे लावलेले होते. या आरशालाच पात्र बनवित सरदेशपांडे यांनी मुलांना ते कसं बोलत आहेत ते आरशात त्यांचे प्रतिबिंबातून दाखविले. आत्मविश्वासने अभिनय करणाऱ्यांना कौतुकाची शाबासकी दिली. मुले चुकत होती तिथे स्वतःला आरशात पाहून सुधारणा कशी करायची, हे त्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखविले. आरशातील प्रतिबिंब हेच आपले खरे शिक्षक मार्गदर्शक आहेत, हे दाखवून दिले. मुलांना त्यांची ही अभिनय शिकविण्याची ट्रिक फारच भावल्याचे दिसले.

taught children to communicate with confidence
Child Care Tips: लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या 'या' समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात मधुमेहाची लक्षणे

सिनेतंत्र, लेखन, गायनाच्या टिप्स

अभिनेत्री योगिता तळेकर यांनी सिनेमाच्या तंत्राबाबत मुलांशी संवाद साधत त्यातील बारकावे समजावून सांगितले. लेखक गिरीधर पांडे यांनी लेखनाच्या टिप्स मुलांना दिल्या. पं. शरद दांडगे यांनी प्रात्यक्षिकासह तबल्यातून निघणारा ध्वनी काय सांगतो ते समजावून सांगितले. पं. विश्वनाथ दाशरथे यांनी गाणं, संगीतावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यशाळेचे अध्यक्ष चाटे स्कूलचे संचालक संदीप राजहंस, प्रमुख पाहुणे शरद कुलकर्णी यांचे बी. पॉझिटिव्ह फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा पांडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ दाशरथे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com