नि:स्वार्थ मैत्री

एकाच क्षेत्रात काम करत असताना, जिथं आपली इतर लोकांशी स्पर्धा असते. अशातच जेव्हा त्यातल्याच एखाद्या व्यक्तीशी आपली घट्ट मैत्री होते ना ते नातं खूप भारी असतं.
actress reena madhukar and aahana kumra
actress reena madhukar and aahana kumrasakal

- रीना मधुकर, अहाना कुमरा

एकाच क्षेत्रात काम करत असताना, जिथं आपली इतर लोकांशी स्पर्धा असते. अशातच जेव्हा त्यातल्याच एखाद्या व्यक्तीशी आपली घट्ट मैत्री होते ना ते नातं खूप भारी असतं. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री रीना मधुकर आणि अभिनेत्री अहाना कुमरा यांच्यासोबत. एका मालिकेदरम्यान रीना आणि अहाना यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्या दोघीही एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या.

यादरम्यान बोलताना रीना म्हणाली, ‘आम्ही ‘अँड टीव्ही’ वाहिनीवरील ‘एजंट राघव’ या शोमध्ये एकत्र काम केलं आहे. यादरम्यानच लूक टेस्टच्या वेळी आम्ही एकमेकींना पहिल्यांदा भेटलो आणि तिथंच आमची ओळख झाली. त्यानंतर मग आमची मैत्री होत गेली. आता तर मी, अहाना आणि आमचे इतर कलाकार मित्र-मैत्रिणी असा आमचा एक मोठा ग्रुप बनला; पण त्या सगळ्यातून मी आणि अहाना एकमेकींच्या खूप जास्त जवळ आहोत.’

अहाना म्हणाली, ‘‘रीना माझी खूप खास मैत्रीण आहे. माझ्या इतर मित्र-मैत्रिणींतून ही खूप वेगळी आहे. खरंतर इंडस्ट्रीमध्ये माझे फारसे फ्रेंड्स नाहीयेत. जे काही फ्रेंड्स आहेत ते शाळा, कॉलेजमधीलच आहेत; पण रीना ही एक अशी व्यक्ती आहे, जी खूप उशिरानं माझ्या आयुष्यात आली आणि माझी मैत्रीण झाली.

एकाच क्षेत्रात काम करत असताना तिथे कोणत्या ना कोणत्या स्वार्थापोटी लोक आपल्याशी मैत्री करतात. म्हणजे पुढे आपल्याकडून काहीतरी फायदा होईल या उद्देशानं लोक आपल्याजवळ येतात; पण रीना आणि माझ्यामध्ये असं अजिबातच नाहीये. आम्ही दोघीही अगदी निःस्वार्थपणे एकमेकींवर प्रेम करतो आणि म्हणूनच तिच्यासोबतचं नातं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.’

अहानाच्या स्वभावाविषयी रीना सांगते, ‘अहाना मोठी हिंदी अभिनेत्री आहे, तिचं हिंदी मनोरंजनसृष्टीत मोठं नाव आहे. एवढं असूनही तिला माज किंवा गर्व नाही. ती अत्यंत विनम्र आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहते. तिचा हाच गुण मला प्रचंड आवडतो. ती येते, तेव्हा तिच्यासोबत पॉझिटीविटी घेऊनच येते. तिला भेटल्यानंतर, तिच्याशी बोलल्यानंतर, खूप छान वाटतं.

तिचा अजून एक गुण म्हणजे ती प्रत्येकासाठी नेहमी ॲव्हेलेबल राहते. म्हणजे जर तिला एका दिवसात दहा ठिकाणांहून बोलवणं आलं असेल, तर ती त्या दहाही ठिकाणी जाऊन येणार. बऱ्याचदा ते शक्य नसतं; पण तरीही ते शक्य करण्यासाठी ती झटत राहणार. तिला नाही म्हणता येत नाही. तिच्या या स्वभावाचा फायदा घेणारेही लोक असतात. तिने याबाबत काळजी घेतली पाहिजे आणि याकडे थोडं प्रॅक्टिकली पाहावं असं मला वाटतं.’

अहाना म्हणाली, ‘‘रीना आणि मी बहुतांश बाबतींत अगदी समान विचार करतो, त्यामुळे आमचं खूप चांगलं पटतं. एक व्यक्ती म्हणून बोलायचं झालं, तर रीना सगळ्यांना मदत करायला नेहमी पुढे असते. आमच्या ग्रुपमध्येसुद्धा कोणाला काही प्रॉब्लेम असेल, तर रीना सगळ्यांत पहिल्यांदा त्या ठिकाणी पोचेल.

आनंदात, सुखात तर सगळेच आपल्यासोबत असतात; पण आपल्या दुःखात, आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत जेन्युइनली जी माणसं असतात तीच ‘आपली’ असतात. रीना तशीच आहे. ती चांगल्या गोष्टींतही माझ्यासोबत असते आणि वाईट वेळेतही मला सपोर्ट करते. तिचं हे नेचर मला अतिशय आवडतं आणि मला अजिबात वाटत नाही, की तिनं बदलावं. मला तिच्यातला आवडणारा दुसरा गुण म्हणजे, ती कधीच नाउमेद होत नाही.

ती जे ठरवते ते मिळवण्यासाठी ती अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करते आणि ते मिळवतेच. ती अतिशय मेहनती मुलगी आहे.’ रीना म्हणाली, ‘अहानानं आज हिंदी मनोरंजनसृष्टीत जी ओळख निर्माण केली आहे, ती स्वबळावर केली आहे. कोणतंही मीडिया बॅकग्राऊंड नसतानाही तिने स्वतःच्या कर्तृत्वावर हे मिळवलं आहे.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com