दिवसाची सुरूवात प्रसन्न करायचीय! ही पाच काम कराच

दिवसाची सुरूवात चुकीच्या पद्धतीने केलीत पूर्ण दिवस आळसात जाईल
morning
morningesakal
Summary

तुम्हाला दिवसाची सुरूवात प्रसन्न करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्ही दिवसाची सुरूवात चुकीच्या पद्धतीने केलीत आणि जीमला गेलात तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही.

फिटनेसचं महत्व सगळ्यांना पटलं आहे. कोरोनानंतर तर, सर्वांनाच फिट रहावं असं वाटतं आहे. त्यासाठीच अनेक लोकं आता जीममध्ये (Gym) व्यायाम करण्यावर भर देत आहेत. एवढंच नाही तर स्वत:च्या खाण्यापिण्यावर देखील निर्बंध लादतात. पण वजन कमी करण्याबरोबरच तुम्हाला दिवसाची सुरूवात (Morning Resolution) प्रसन्न करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्ही दिवसाची सुरूवात चुकीच्या पद्धतीने केलीत आणि जीमला गेलात तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे ही सुरूवात प्रसन्न आणि आरोग्यसंपन्न करण्यासाठी पाच गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सकाळी उठल्या उठल्या (morning routine) या गोष्टी तुम्ही करू शकता.

warm water
warm watersakal

गरम पाणी प्या

सकाळी उठल्या उठल्या पहिले काम करायचे ते म्हणजे, गरम पाणी प्यायचे. उन्हाळा असो वा हिवाळा गरम पाणी पिणे सोडू नका. ते पिण्याची सवयच अंगी बाणवा. त्यामुळे तुम्हाला गरम पाणी पिण्याची सवय लागेल. त्यात तुम्ही थोडासा लिंबाचा रस किंवा मध घालू शकता. पण जर तुम्ही काहीही एकत्र न करता जरी गरम पाणी प्यायल्यात तरी आराम मिळेल.

morning
थंडीच्या दिवसांत गरम पाणी पिण्याचे फायदे; वजनही होईल कमी
Exercise
Exerciseesakal

आळस झटकून व्यायाम करा

थंडीच्या दिवसात व्यायाम करणे अनेकांना जीवावर येते. झोपून राहावं असं वाटतं. पण आळस झटकून तुम्ही जर सकाळी ३० ते ४० मिनिटांचा व्यायाम केलात तर तुमचे वजन कमी व्हायला मदत होईल. यामुळे तुम्ही हेल्दी आणि फिट राहाल. पण व्यायाम करण्याआधी थोडेसे काहीतरी नक्की खा. कारण रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने तुम्हाला चक्कर येऊ शकते. व्यायामापूर्वी तुम्ही ज्यूस किंवा स्मूदी पिऊ शकता.

morning
Mental Health Care : नववर्षात करूया मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प
tea
teaesakal

रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिऊ नका

अनेक लोकांच्या दिवसाची सुरूवात चहा-कॉफीनेच होते. चहा-कॉफी प्यायल्याशिवाय ते कोणतेही काम करू शकत नाही. पण, हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक असू शकते. कारण कॉफीत केफेनचे प्रमाण जास्त असते. रिकाम्या पोटी केफेन घेतल्यास एसिडिटी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही उठल्याउठल्या काही पिण्याचा विचार करत असाल तर ग्रीन टी पिण्याचा विचार नक्की करा.

morning
सकाळी कॉफी प्या, डोळे चांगले ठेवा
Vitamin D
Vitamin D esakal

उन्हात बसा

सकाळी उठल्यावर १० ते १५ मिनीटं उन्हात बसणे फायद्याचे असते. यामुळे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. तसेच एनर्जीही भरपूर मिळत असल्याने तुमचा दिवस चांगला जातो. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी उन्हात बसल्याने फायदा होतो.

morning
हृदयाच्या आरोग्यासाठी बसा उन्हात, मिळेल व्हिटॅमिन डी, संशोधनात स्पष्ट
BreakFast
BreakFastesakal

नाश्ता करायची सवय ठेवा

सकाळच्या धावपळीत लोकं नाश्ता करायला विसरतात. एकदम दुपारी जेवतात. असे केल्याने त्रास होऊ शकतो. रात्रभर पोट रिकामे असते. भुकेल्या पोटाला सकाळी नाश्त्याची खूप गरज असते, त्यामुळे नाश्त्यात उच्च प्रथिनयुक्त पदार्थ घ्या. यासाठी तुम्ही फळे, चीज, दही, अंडी, चीज, नट्स या गोष्टींचा समावेश करू शकता.

morning
अंजीर खा, वजन कमी करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com