Mental Health Care : नववर्षात करूया मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mental Health
Mental Health Care : नववर्षात करूया मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प

Mental Health Care : नववर्षात करूया मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प

नवीन वर्षात प्रवेश करत असताना अनेकजण विविध संकल्प करतात. त्यात शारीरिक तंदुरूस्त राहणे (Physical Health)हाही एक संकल्प असतो. त्यासाठी चालणे, जीम असे पर्याय अवलंबले जातात. पण हा संकल्प फार कमी लोकं नित्यनियमाने करतात. पण जसा तुमचा शारीरिक फिटनेस महत्वाचा आहे तसाच मनाचा फिटनेसही (Mental Health) महत्वाचा आहे. आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.

कोरोना काळात अनेकांना आर्थिक समस्यांनी ग्रासले. त्यामुळे नैराश्य आले. हे नैराश्य बाहेर काढता येत नसल्याने, कोणाशी मोकळेपणाने बोलता येत नसल्याने अनेकांना मानसिक चिंता निर्माण झाल्या. गेल्या दोन वर्षात मानसिक आरोग्याशी निगडित अनेक समस्या बघायला मिळाल्या. शारीरिक फिटनेसबरोबर मनाचा फिटनेसही महत्वाचा आहे तरच तुम्ही सक्षमपणे समाजात वावरू शकता.

Mind

Mind

सकारात्मक राहणे गरजेचे (How to Stay Positive)

इतर देशांच्या तुलनेत भारतात मानसिक आरोग्याविषयी (Mental Health Care)कमी जागरुकता आहे. आपल्याकडे मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केलं जातं. मानसिक आरोग्याविषयी आजही पुरेशी जागरूकता आणि महत्त्व पाहायला मिळत नाही. मानसिक आजाराविषयी मनात न्यूनगंड न बाळगता व्यक्त व्हायला शिका, असं मनोविकारतज्ज्ञ सांगतात.

माइंडफुलनेस राहा (Mindfulness Important)

वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी सांगितले की, यावर्षी आपण माइंडफुलनेसकडे (Mindfulness) लक्ष दिले पाहिजे. साथीच्या काळात बर्‍याच गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आपण प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार असू शकत नाही, म्हणून काही गोष्टी परिस्थितीवर सोडून द्या आणि स्वतःला क्षमा करा, असेही त्या सांगतात. डॉ. आनंद या पुढील वर्षासाठी बसून राहण्याऐवजी अधिक सक्रिय जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात. मुलांनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि त्यांनी इनडोअर गेम्स, व्यायाम या गोष्टींवर लक्ष द्यावे.

Mind

Mind

आत्मजागरूक व्हा(Self-Awareness Importance)

एक संकल्प म्हणून सेल्फ हिलिंग अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. एक चांगला माणूस होण्यासाठी एखाद्याने आत्म-जागरूकता विकसित करण्यावर करावे. कारण जेव्हा तुम्ही एक चांगले व्यक्ती असता तेव्हा तुमच्या सभोवतालच्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकता, असे आनंद सांगतात.