esakal | Advice for Teenagers : मित्रांसोबत बाहेर जाताना आई-बाबांसोबत वाद कसा टाळू?
sakal

बोलून बातमी शोधा

Advice for Teenagers : मित्रांसोबत बाहेर जाताना आई-बाबांसोबत वाद कसा टाळू?

Advice for Teenagers : मित्रांसोबत बाहेर जाताना आई-बाबांसोबत वाद कसा टाळू?

sakal_logo
By
शरयू काकडे

पालक म्हणून मुलांना सांभाळण, त्यांना काय हवं नको ते पाहणं, त्यांना चांगले वळण लावणं हे वाटतं तितक सोप्प काम नाही, खासकरुन जेव्हा मुलं विशीच्या उंबरठ्यावर (टीनएजर्स) असतात तेव्हा. कारण या वयात मुलांना जग कळायला लागतं. या वयात मुलं आयुष्याचा, शिक्षणाचा, करिअरचा, लाईफ पार्टनरचा विचार करू लागतात. विविध माध्यामामधून नवनवीन माहिती टिनएजर्स समोर येत असतात. टिनएजर्सला हे नवं जग हवं असते. मित्र-मैत्रिणींसोबत मजा-मस्ती करावी, नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर कराव्या, स्वत:साठी निर्णय घ्यावेत असे वाटत असते. तुम्ही टिनएजर्स असाल तर तुम्हालाही असेच वाटत असेल, हो ना! पण, पालकांच्या मात्र तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात.

साध मित्रांसोबत बाहेर निघालो तरी आई-वडिल हजार प्रश्न विचारतात आणि तुम्हाला मात्र असे प्रश्न विचारले की प्रचंड राग येतो. अशावेळी तुम्ही उत्तर देणे टाळता. पालकांना काही न सांगता किंवा लपवून काही गोष्टी करून लागता. त्यामुळे नेमक बाहेर जाताना पालकांसोबत वाद होतात. बाहेर जाताना तुमच्या पालकांसोबत वाद टाळायचा असेल तर काय करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा: Pitru Paksha 2021 : कधी सुरू होतोय पितृपक्ष?

पालक असे का वागतात हे आधी समजून घ्या

  • पालक हे तुमचे शत्रू नाहीत हे समजून घ्या. त्यामुळे ते जे काही करतात ते फक्त तुमच्या हिताचा करुनच करतात. नेहमी पालकांचा आदर राखा, त्यांच्याशी वाद घालू नका.

  • पालक मुलांची नेहमी काळजी वाटत असते. तुमच्या सुरक्षितेतची, तुमच्या गुणांची, तुमच्या करिअरची, तुमच्या इमेजची, तुम्हाला वाईट संगत लागू नये, खर्चाची आणि स्वत:च्या प्रतिष्ठेची काळजी असते. त्यामुळे पालक वारंवार तुम्हाला सूचना देत असतात.

  • कित्येक पालकांना आपली मुलं आपल्यापासून लांब जात आाहे असे वाटते त्यामुळे मुलांना वर सारख लक्ष ठेवतात.

  • आईवडिलांचे विचार आणि तुमच्या विचारांमध्ये खूप अंतर असते. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा पालकांचा आणि तुमचा दृष्टीकोन वेगळा असतो.

  • आपली मुलं ते कुठे जातात, कोणासोबत जातात हे पालकांना माहित असावे अशी त्यांची अपेक्षा असते. तुम्ही जेव्हा आई-वडिलांना काहीच सांगत नाही तेव्हा हायपर किंवा पॅनिक होतात आणि त्यामुळे वाद वाढतात.

हेही वाचा: जाणून घ्या: बिर्याणीत वापरल्या जाणाऱ्या पुदिनाविषयी

आईवडिलांसोबत वाद घालू नये म्हणून काय कराल?

  • तुम्ही बाहेर जाताना तुम्ही कुठे, कोणासोबत जात आहात, कधी परत हे स्वत:हून सांगितले पाहिजे.

  • आपले मित्र-मैत्रीणी कोण आहेत हे पालकांना माहित असणे गरजेचे आहे. आपली संगत चांगली आहे हे समजल्यावर पालकांची चिंता थोडी कमी होते.

  • कोणत्याही गोष्टीला पालक नाही असताना जर तुम्हाला तुमचा निर्णय योग्य वाटत असेल तर तुमचे म्हणले पालकांशी शांतपणे बोलून पटवून द्यायला हवे.

  • नेहमी महत्त्वाच्या विषयांवर पालकांच मत घ्या. त्यांच काय म्हणणे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.

  • चूक झाल्यास किंवा काहीतरी अनपेक्षित घडल्यास पालकांना विश्वासात घेऊन सर्व काही सांगा. तुमचे पालक नेहमी तुमच्या सोबत असतील हे विसरू नका.

(संदर्भ: पुस्तक – @20 विशीच्या उंबरठ्यावर युवा पिढीशी खुला संवाद, सकाळ प्रकाशन, लेखिका- डॉ. श्रुती पानसे)

loading image
go to top