
डॉ. राजश्री पाटील - प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठ
स्वयंपाकघराची रचना हा स्वतंत्र विषय आहे. असं असलं, तरी ही रचना करताना इंच इंच भूमी लढवावी लागते. उपलब्ध जागेचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा लागतो आणि सगळ्या वस्तू सहज सापडतील अशा रीतीने ठेवाव्या लागतात. आता जिथे जागेचा एवढा काळजीपूर्वक विचार करावा लागतो, तिथे सजावट कसली? तर ती करता येते. दैनंदिन जीवनात आपापलं सौंदर्यशास्त्र असावं म्हणजे आपलं कामाचं आणि विसाव्याचं ठिकाण, सचेतन सुंदर होतं.