
गौरी ढोले-पाटील
माळीणगावमध्ये २०१४ मध्ये भूस्खलन झाले होते, त्यावेळी मी आणि माझी मैत्रीण नूपुर पवार आम्ही दोघींनी मिळून ठरवलं, की आपण या गावाला मदत करूया. त्यावेळी आमचे वेगवेगळे छंद असलेल्या मैत्रिणींचे ग्रुप होते. आम्ही सर्वजणी त्यावेळी दर महिन्याला भेटायचो. आम्ही सर्व मैत्रिणींनी त्यावेळी एक प्रदर्शन भरवलं होतं. त्या प्रदर्शनाला आम्ही ‘कलाग्राम’ असं नाव दिलं. त्यामधून झालेल्या नफ्यातून आम्ही गाद्या, घरात लागणाऱ्या वस्तू, संसाराची भांडी अशा प्रकारचं सामान माळीण गावातील गरजूंना दिलं.