
थोडक्यात:
शहरातील ८२ टक्के प्रोफेशनल्सचा विश्वास आहे की, एआय त्यांच्या दैनंदिन कामकाज जीवनामध्ये सुधारणा करू शकते.
मुंबईतील ७३ टक्के प्रोफेशनल्सना एआय प्रत्यक्ष निर्णय घेण्याकरिता नाही तर लेखन आणि मसुदा तयार करण्यासाठी उपयुक्त वाटते.
पण, ७७ टक्के प्रोफेशनल्स कामावर निर्णय घेताना एआयपेक्षा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतात.
Mumbai Professionals AI Survey: एआय टूल्स अधिक प्रगत होत आहेत आणि कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत, तरीही प्रोफेशनल्स एका मुद्दयावर स्पष्ट आहेत, ते म्हणजे मोठे निर्णय घेण्यासंदर्भात मानवी निर्णयाला अधिक प्राधान्य देतात. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइन (LinkedIn,)च्या नवीन संशोधनानुसार, भारतातील ८३ टक्के प्रोफेशनल्स आणि मुंबईतील ८२ टक्के प्रोफेशनल्सचा विश्वास आहे की निर्णय घेताना एआयपेक्षा क्षमता आणि विश्वासू सहकारी महत्त्वाचे आहेत. हे अशा वेळी निदर्शनास आले जेथे शहरातील ७९ टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याची गती वाढली आहे आणि ७३ टक्के प्रोफेशनल्सना वाटते की त्यांच्या पुढील करिअरसाठी एआयमध्ये प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे.
मुंबईतील ४ पैकी ३ प्रोफेशनल्सना मान्य करतात की एआयमध्ये प्रभुत्व मिळवणे हे दुसरे काम करण्यासारखे आहे, पण त्यांना त्याबाबत आशा आहे.