उद्यम‘चक्रा’ला गती

बहुतांश मुले ही वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार करतात. मात्र, मी एक मुलगी म्हणून चौथीमध्ये शिक्षण घेत असतानाच विचार केला होता, की आपल्याला वडिलांच्या उद्योगाला हातभारच नाही.
tyre retreading
tyre retreadingsakal

- आकांक्षा नाईक, महिला उद्योजिका

बहुतांश मुले ही वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार करतात. मात्र, मी एक मुलगी म्हणून चौथीमध्ये शिक्षण घेत असतानाच विचार केला होता, की आपल्याला वडिलांच्या उद्योगाला हातभारच नाही, तर सर्वस्वी जबाबदारी घ्यायची आहे.

टायर रिट्रेडिंग हा वडिलांचा उद्योग. या क्षेत्रामध्ये पुरुषांचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, एक महिला म्हणून मी या उद्योगात येण्याचा निर्णय घेतला. माझे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण संपत आल्यानंतरही बाबांनी मला पुन्हा एकदा विचारले, की ‘आकांक्षा, बेटा तुला खरेच हा व्यवसाय करायचा आहे का? की तुझा विचार बदलला?’ मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले आणि या व्यवसायात पदार्पण केले. त्यानंतर नाशिकमध्ये आनंद टायर्सचे काम पाहू लागले.

व्यवसायात येण्याची इच्छा

मी हॉटेल मॅनेजमेंटमधली पदवी घेतली आहे. तशी या क्षेत्रातील फारशी माहिती मला नव्हती. त्यामुळे मला प्रशिक्षण घेणे गरजेचे वाटले. त्यासाठी कोईमतूरला जाऊन दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात मी सहभागी झाले.

आनंद नाईक म्हणजे माझे वडील. त्यांनी तीस वर्षांपूर्वी एलजी रबर कंपनी लिमिटेड, कोईमतूर या कंपनीची फ्रँचायझी घेतली होती. काही वर्षे बाबांनी आमच्या ‘आनंद टायर्स’चे काम पाहिले आणि निवृत्ती घेतली. त्यांच्यानंतर हा व्यवसाय कोण सांभाळणार, असा प्रश्‍न होता आणि मलाही लहानपणापासून त्यांची मुलगी म्हणून हा व्यवसाय चालू ठेवायचा होता.

मला जसे त्यांनी लहानाचे मोठे केले, त्यांचे कर्तव्य पार पाडले, तसेच कंपनीही माझ्याबरोबरीने मोठी झाली आणि तेच बघत मी वाढले होते. त्यामुळे वडील आणि कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आत्मविश्‍वासाच्या बळावर मी या क्षेत्रात आले.

सुरुवातीला मी कंपनीमध्ये जाऊ लागले, तेव्हा माझ्या वयाएवढा अनुभव असणारे कर्मचारी तेथे काम करत होते. काहींना मी काम सुरू केलेले पटले नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मतभेद होत होते. मात्र, काही काळानंतर समन्वय होण्यास सुरुवात झाली. या क्षेत्रात स्वःचे अस्तित्व निर्माण करणे हा माझ्यासाठी एक टास्क होता. मात्र, ग्राहकांशी बोलून त्यांचा विश्‍वास संपादन करायला मला फार वेळ नाही लागला.

बिझनेस मंत्रा

कोणतीही गोष्ट सुरू करण्यासाठी कष्ट लागतात. मात्र, त्याचबरोबर काम करताना आणि कष्ट करताना त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. मार्केटिंग आणि अभ्यासपूर्ण संकल्पना असली पाहिजे. कोणत्याही महिलेने स्त्री आणि पुरुष भेद न करता सुरुवात केली पाहिजे. महिला कोणताही व्यवसाय करू शकते. आपणच स्वतःचे उदाहरण तयार करू शकतो. अमुक व्यवसाय पुरुषप्रधान आहे असे म्हणत बसलो तर परिवर्तन कसे होणार?

टायर रिट्रेडिंग म्हणजे नेमके काय?

ट्रक, डंपर, क्रेन, ट्रॅक्टर, जेसीबी, स्कूल बस, ट्रॉलीज्‌ यांसारख्या अवजड आणि मोठ्या वाहनांचे टायर प्रत्येक वेळी नवीन बसवणे हे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. त्याचबरोबर खराब झालेल्या टायर्समुळे होणारा कचरा हा निसर्गासाठी घातक आहे. टायर जुने झाले किंवा गुळगुळीत झाले, की ते बदलले जातात; पण हेच जुने टायर आपण रिमोल्ड करून परत वापरू शकतो. रिट्रेडिंग करून टायरचा पुनर्वापर केल्यामुळे त्याचा टिकाऊपणाही वाढतो आणि कमी खर्चात हे काम करता येते.

रिट्रेडिंगमध्ये संपूर्ण टायर आतून-बाहेरून तपासला जातो. कुठे खिळे, दगड असे काही अडकले असेल तर ते काढले जाते. त्यानंतर टायरची आतली बाजू तपासली जाते. हा रिकामा टायर (केसिंग) घेऊन त्यावरचा गुळगुळीत झालेला भाग काढून टाकण्यात येतो. त्या भागावर एक विशिष्ट प्रकारचे सोल्युशन लावले जाते. त्यानंतर त्यावर एक कच्च्या रबराची पट्टी चिकटवली जाते. यानंतर टायरवर आपल्याला जे डिझाईन दिसतं ती पट्टी म्हणजे ट्रेड चढवला जातो. हे सगळे नीट व्यवस्थित लावून झाल्यावर त्या टायरवर पुढील प्रक्रिया केली जाते.

(शब्दांकन : सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com