esakal | सिल्कच्या साड्या अधिक टिकाव्यात यासाठी लक्षात ठेवा या आठ टिप्स!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Remember these eight tips to make silk sarees more durable!

रेशीम साड्यांची फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. आपण जेव्हा रेशीम साडी नेसता तेव्हा ते नेहमीच तुम्ही वेगळी आणि खुलून दिसतात. म्हणून एकदा आपण रेशीम विकत घेतल्यास, ती बराच काळ वापरू शकता.

सिल्कच्या साड्या अधिक टिकाव्यात यासाठी लक्षात ठेवा या आठ टिप्स!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

रेशीम साड्यांच्या अनेक प्रकार भारतात बनवल्या जातात. या साड्या जितक्या सुंदर दिसत आहेत तसेच त्या नेसताना मात्र अधिक त्रास होता. परंतु त्यांच्या देखभाल ही तितकीच करावी लागते. त्यामुळे या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक महिला रेशमी साड्यांचा वापर करणं किंवा विकत घेणं टाळतात. कारण बर्‍याचदा असं घडते की अशा साड्या चुकीच्या ठेवल्यामुळे खराब झाल्या आहेत. आपल्याकडेही जर रेशीम साडी असेल आणि ती ठेवल्यामुळे ती खराब होत असेल तर आज आम्ही काही टिप्स घेऊन त्या टीप नक्की वापरून बघा…
रेशीम साड्यांची फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. आपण जेव्हा रेशीम साडी नेसता तेव्हा ते नेहमीच तुम्ही वेगळी आणि खुलून दिसतात. म्हणून एकदा आपण रेशीम विकत घेतल्यास, ती बराच काळ वापरू शकता.

१. रेशीम साडी नेहमी कागदात किंवा कापसाच्या कपड्यात लपेटली पाहिजे. कधीही थेट प्लास्टिकमध्ये ठेऊ नका.


२. रेशीम भरतकाम आणि ब्रोकेडची चमक कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे की तो भाग आतल्या बाजूने दुमडलेला असावा.

३. त्याचबरोबर कोणताही सिल्क साडी सहा महिन्यातून एकदा कपाटातून काढून उजेडात काही काळ ठेवणे गरजेचे आहे. मात्र डायरेक्ट सूर्यप्रकाशात नेणं टाळा

४. लोखंडी हॅन्गरमध्ये कधीही रेशीम साडी लावू नका. असे केल्याने साडीवर लोखंडाचा गंज येऊ शकतो.

५. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिल्कच्या साडीची घडी सतत बदलत रहा. नाहीतर एका ठिकणी सतत घडी आल्यामुळे तो भाग विरू शकतो.

६. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी रेशमी साड्या धुण्याचा प्रयत्न करू नका. रेशमी साड्या कायम ड्राय क्लिनींग करा.

७. वर्षानुवर्षे रेशीम झरी साडीची चमक कायम ठेवण्यासाठी, भरतकामाच्या भागास घडी करून आतील भागामध्ये ठेवा, जेणेकरून त्याची चमक कायम राहील.

८. घरी कधीही रेशीम झरी साडी धुवू नका.

संपादन - विवेक मेतकर