

Akshaya Tritiya 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share
sakal
Akshaya Tritiya 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. यावर्षी १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. हा दिवस कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो.
धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. या खास प्रसंगी आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना मराठीतून सुंदर शुभेच्छा देऊन हा दिवस अधिक आनंददायी बनवू शकता.