Alcohol Deaddiction: हो, दारूचे व्यसन सुटू शकते, फक्त ही ९ पथ्ये पाळा!

व्यसनाच्या आजारातून मुक्त होण्यासाठी बऱ्याच अंशी उपचाराची गरज असते.
Alcohol Deaddiction
Alcohol DeaddictionSakal

संतोष सावळकर

दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारूचे व्यसन सोड म्हणणे सोपे; परंतु जी व्यक्ती या व्यसनाच्या विळख्यात असते, तिला ते सहज साध्य करता येत नाही. कारण ती व्यक्ती दारूच्या व्यसनाने आजारी असते. शरीर, मनाने तसेच सामजिक, आध्यात्मिक व आर्थिकदृष्ट्या खचलेली असते. व्यसन सोडण्यासाठी मन तयार झाले, तरी शरीर साथ देत नाही. व्यसनाच्या आजारातून मुक्त होण्यासाठी बऱ्याच अंशी उपचाराची गरज असते. सोबतच काही पथ्ये, नियम पाळणेही तेवढेच महत्त्वाचे. याबद्दल जाणून घेऊया...

Alcohol Deaddiction
Mental Health : अशांत अन् अस्थिर मनाला शांत कसं ठेवाल? आजच करून बघा हा उपाय

१. औषधं नियमित घेणे

डॉक्टरांनी दिलेलं औषध वेळेवर व ठरलेल्या कालावधीसाठी पूर्णपणे घेणे हे दारू सोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पथ्य आहे. अनेक जण काही दिवस औषध घेतात व बंद करतात. असे न करता, औषध घेण्यामुळे आत्मविश्वास वाढतो व दारूमुक्तीचा मार्ग भक्कम होण्यास मदत होते.

२. व्यसनी मित्रांना टाळणे

उपचार घेतल्यावर पुन्हा व्यसनी मित्रांच्या संगतीने राहणे, त्यांच्या सोबत वेळ घालविणे म्हणजे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्या मित्रांसोबत आपण पार्ट्या करायचो, नशेत राहणे हाच आनंद मानायचो, अशा मित्रांसोबत कामापुरते संबंध ठेवणे हे व्यसनमुक्तीचे महत्त्वाचे पथ्य आहे.

Alcohol Deaddiction
Girish Bapat Health : बापट व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी काय दिली माहिती?

३. कुटुंबासोबतचा संवाद वाढविणे

व्यसनातला काळ पूर्णपणे नशेत गेलेला असतो. मुलांना बापाचं, बायकोला नवऱ्याच प्रेम व असे म्हाताऱ्या आई-वडिलांना पोराचा आधार कधीच मिळालेला नसतो. कुटुंबाचा पुरता गेलेला विश्वास संपादन करण्यासाठी कुटुंबाकरिता ज्या गोष्टी आपण या अगोदर केल्या नाही, त्या आता करणे व संवाद वाढविणे आवश्यक असते.

४. राग किंवा क्रोधावर नियंत्रण ठेवणे

एखादी क्षुल्लक गोष्ट जरी व्यसनी माणसाच्या मनाविरुद्ध घडली की राग येणे, डोकं गरम होणे व त्यावर उपाय कोणता तर भट्टीकडे जाणे ठरलेलेच असते. रागाच्या या भावनेतून कितीतरी दारू सोडलेले व्यक्ती पुन्हा पिण्याकडे वळल्याची उदाहरणं आहेत.

५. स्वतःला तीव्र ताणतणावापासून दूर ठेवणं

प्रत्येक कामाचा थोडातरी ताण प्रत्येक व्यक्तीवर असतोच; पण व्यसनी व्यक्तीला एखाद्या छोट्या गोष्टीचा ताण प्रचंड वाटू लागतो. म्हणूनच त्या विशिष्ट गोष्टीचा ताण किती घ्यायचा आणि प्रत्यक्षात किती ताण आहे, यातला फरक शोधायला शिकणं हे त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचं असतं.

Alcohol Deaddiction
Girish Bapat Health : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली

६. उपाशी पोटी बाहेर न पडणं

दारू पिणाऱ्यांमध्ये उपाशी पोटी दारू घेतल्यावर चांगली नशा चढते असा समज आहे. पोट रिकामं असलं की दारू पिण्याची त्यांची तीव्र इच्छा होते. हा एक धोक्याचा घटक आहे. म्हणून बाहेर जाताना खाऊनच निघाले पाहिजे.

७. थकवा येईल एवढे काम करू नये

व्यसनमुक्तीच्या सुरुवातीच्या काळात खूप थकवा येईल एवढे काम करणे टाळावे. कारण, दारू घेणाऱ्यापैकी काही जण शरीराचा थकवा घालविण्यासाठी थोडी दारू घ्यावीच लागणार हे कारण पुढे करणारे असतात. म्हणून कामाचा अतिरेक टाळावा.

Alcohol Deaddiction
Yoga For Men's Health : विवाहित पुरुषांनी ही योगासने करावी, आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकीत

८. दारू पिण्याच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा न देणे.

दारूच्या रिकाम्या बाटल्या घरात ठेऊ नका. आपण कलाकार असल्यास नाटकामध्ये दारुड्याची भूमिका करू नका. कारण दारू पिणाऱ्या व्यक्तीचं शरीर नंतर आणि मन पहिल्यांदा दारू पितं हे पक्क लक्षात ठेवा. मनात पिण्याचे विचार आले की शरीर आपोआप भट्टीकडे जाते.

९. अतिआत्मविश्वास होऊ नं देणे

दारू सोडल्यानंतर काही दिवसांत अनेकांमध्ये आपली दारू सुटली. आता काही चिंता नाही, असे वाटायला लागते आणि अतिआत्मविश्वास होतो. पुन्हा दारूकडे जाण्याचा धोका ओढवू शकतो.ही सर्वच पथ्ये अतिशय महत्त्वाची असून दारूमुक्तीसाठी गरजेची आहेत.

(लेखक हे ‘मुक्तिपथ’अंतर्गत कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व तालुका क्लिनिकमध्ये समुपदेशक हे सर्व पथ्ये रुग्णांना समजून सांगतात)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com