Mobile Care Tips: आजकाल अनेक लोकांकडे अँड्रॉईड फोन आहेत. अशा फोनमध्ये अनेक ॲप्स त्यामध्ये आधीच इंस्टॉल केलेले असतात. आयफोन व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये हे ॲप्स प्री-इंस्टॉल केलेले असतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हे ॲप्स असेच येत नाहीत, तर त्यामागे खुप मोठे कारण आहे. मोबाईल कंपन्यांना या ॲप्सच्या बदल्यात प्रचंड पैसा तर मिळतोच पण त्याशिवाय त्यांच्या माध्यमातून हॅकिंगही केली जाते. तुमच्या फोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेले ॲप्स तुमची हेरगिरी करू शकतात आणि तुमचा वैयक्तिक डेटा चोरू शकतात.
कोणत्या अप्सचा आहे समावेश
डब्लिनमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनानुसार, अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेले ॲप्स गुप्तपणे यूजर्साचा डेटा त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर करत आहेत. हे ॲप्स स्क्रीन आकार, फोन कॉल्स, डिव्हाइस आयडेंटिफायर इत्यादी माहिती स्टोअर करतात. हा अहवाल तयार करण्यासाठी भारतात आणि जगात विकल्या गेलेल्या सर्व फोनमधून पाठवलेल्या डेटाचा वापर करण्यात आला आहे. हेरगिरीचा आरोप असलेल्या ॲप्समध्ये गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट ॲप्सची नावे आहेत.
अनइंस्टॉल करणे अवघड
फोनमधील प्री-इंस्टॉल केलेले काही ॲप्स तुम्ही अनइंस्टॉल करू शकता, पण काही ॲप्स आहेत जे तुम्ही डिलीट किंवा अनइंस्टॉल करू शकत नाही. अहवालात असे म्हटले आहे की काही स्वस्त फोनमध्ये येणारे सर्व प्री-इंस्टॉल केलेले ॲप्स कंपनीला ॲप स्क्रीनचे तपशील पाठवतात. यामध्ये प्रत्येक ॲपवर घालवलेल्या वेळेची माहिती असते. हा डेटा सिंगापूर आणि युरोपच्या बाहेरही पाठवला जात असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
कसा बचाव कराल?
सध्याच्या फोनमध्ये फेसबुक, गुगल, ॲमेझॉन, व्हॉट्सॲप, स्पॉटीफाय सारखे ॲप्स प्री-इंस्टॉल केलेले असतात. अशावेळी फोनवर प्री-इंस्टॉल केलेले ॲप्स न वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला ॲप वापरायचे असेल तर आधी ते डिलीट किंवा अनइंस्टॉल करा आणि ते ॲप पुन्हा गुगल प्ले स्टोअरवरून जाऊन डाउनलोड करा, त्यानंतरच त्यात लॉग इन करून वापरा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.