
Skin Care : आलिया भट्ट घरीच बनवते स्पेशल फेस पॅक, तिचा 'हा' उपाय वाचा अन् मिळवा ग्लोइंग स्किन
Alia Bhatt Skin Care : त्वचेची काळजी ही महत्वाचीच ठरते. तसेच हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या काळात त्वचेवर ड्रायनेस जास्त असतो. त्यामुळे स्किनवर ग्लो येणे कठीणच ठरते. मात्र तुम्ही योग्य प्रकारे त्वचेला क्लिंझ केलंत तर तुमची स्किन आलियासारखी ग्लोइंग दिसू शकते.
आलियाची गणना बॉलीवूडमधल्या ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. अनेक महिलांना आलियासारखं ग्लोइंग आणि सुंदर दिसायचं असतं. तेव्हा आज अशा महिलांसाठी हा उपाय आवर्जून वाचावा. घरच्या घरी हे 4 फेस पॅक बनवत त्वेचेला डिप क्लिंजींग करा. तुमचीही स्किन आलियासारखी ग्लो करेल.
हळदीमध्ये असलेले आयुर्वेदिक गुण पिगमेंटेशन आणि टॅनिंग दूर करते. तेव्हा तुम्ही एक टमाटर बारीक करून त्यात हळद आणि खोबरेल तेल टाकत त्याचा फेसपॅक 15 मिनीटांसाठी चेहऱ्याला लावा. नंतर चेहरा धुवून घ्या. (Beauty Tips)

Tomato turmeric face pack
मुलतानी माती आणि दही दोन्ही चेहऱ्यासाठी उत्तम आहे. या दोघांना मिक्स करून फेस पॅक तयार करून घ्या. आणि 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. सगळ्यात शेवटी फेस वॉश करून घ्या.

curd pack
तुम्ही मधासह अॅप्पल सायडर विनेगर समान प्रमाणात घ्या. त्याला मिक्स करून चेहऱ्याला लावा. हा फेस पॅक 15-20 मिनीटांसाठी सोडा. याने तुमचा चेहरा क्लिन आणि मॉश्चराइज होईल.

apple sider vinegar
एका वाटीत लिंबाचा रस आणि हळद मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टला 15 मिनीटांसाठी चेहऱ्याला लावा. त्यानंतर साफ पाण्याने चेहरा धुवून घ्या. तुमचा चेहरा डीप क्लिझिंगसह एक्सफोलिएटदेखील होईल.

turmeric Face pack
डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.