esakal | केसांच्या समस्या कोरफडने सोडवा फ्रि मध्ये! एकदा ट्राय करा

बोलून बातमी शोधा

aloe vera
केसांच्या समस्या कोरफडने सोडवा फ्रि मध्ये! एकदा ट्राय करा
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोरफड अनेक समस्यांवर आयुर्वेदिक औषध म्हणून ओळखले जाते. कोरफड केसांसाठी बर्ऱ्यापैकी फायदेशीर ठरू शकते. कोरफडीचा वापर केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेला ग्लो येण्यासाठी करतात. यामुळे तुमचे केस लवकर आणि दाट वाढण्यात मदत होईल. केस वाढण्यासाठी केसांना जास्तीत जास्त मालिश करण्याची गरज असते. अशावेळी कोणते तेल वापरावे याबबात मनात शंका असते. अशावेळी नॅचरल ऑईलचा वापर करावा. त्यामुळे केस गळणेही कमी होईल.

कोरफडीचे तेल केसांसाठी उपयुक्त

कोरफडीमध्ये अनेक आयुर्वेदीक गुणधर्म आहेत. यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. केसांचे उत्तम पोषण करण्यासाठी कोरफडीच्या तेलाचा उपयोग करू शकता. कोरफडीबरोबरच जोजोबा ऑईल, ऑलिव ऑईल, या तेलांमध्ये नारळाचे तेल मिक्स करून त्याचा वापर केसांसाठी करता येतो. केसांच्या मुळांना हलक्या हाताने या तेलाने मालिश करावे.

तेल कसे तयार कराल?

कोरफडीमध्ये अनेक आयुर्वेदीक गुणधर्म आहेत. यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. केसांचे उत्तम पोषण करण्यासाठी कोरफडीच्या तेलाचा उपयोग करू शकता. कोरफडीबरोबरच जोजोबा ऑईल, ऑलिव ऑईल, या तेलांमध्ये नारळाचे तेल मिक्स करून त्याचा वापर केसांसाठी करू शकता. तुमच्या केसांना आमि त्यांच्या मुळांना हलक्या हाताने या तेलाचा वापर करायचा आहे. यासाठी कोरफडीचे तेल कसे तयार करायचे याची कृती बघूया

साहित्य

कोरफडीचे पान

अर्धा कप नारळाचे तेल

कृती

कोरफडीचे स्वच्छ धूवुन घ्यावे. सुरीच्या मदतीने वरील भाग अलगद काढावा. आतले कोरफडीचे जेल सावधानपुर्वक एका भांड्यात काढून घ्यावे. आता नारळाच्या तेलात हे कोरफडीचे जेल मिसळावे. मिश्रण नीट एकजीव होण्यासाठी मिक्सरचाही वापर करू शकता. अशा पध्दतीने कोरफडीचे तेल तयार होईल. हे तेल आपण केस आणि त्वचा मॉइश्चरायझर करण्यासाटी वापरू शकतो.