सोन्यासारखी चेहऱ्यालाही येईल चमक, Glowing Skin साठी हे 5 घरगुती उपाय करुन पहा

बाजारातील केमिकलयुक्त Skin care प्रोडक्ट वापरण्याएवजी तुम्ही काही घरगुती उपायांनी चेहऱ्याची चमक वाढवू शकता. तसचं पिंपल्सची समस्या देखील दूर करु शकता
Glowing Skin Home Remedies
Glowing Skin Home RemediesEsakal

Glowing Skin Home Remedies: उन्हाळ्यामध्ये सुर्याच्या तीव्र किरणांमुळे चेहऱ्याचा रंगच बदलून जातो. एवढचं नाही तर त्वचा अनेकदा निस्तेज आणि कोमेजलेली दिसू लागते.

त्याचसोबत घाम त्यात प्रदूषण Pollution आणि धूळ Dust यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्यादेखील सुरू होते. amazing home remedies for pimple free glass like skin

उन्हाळ्याच्या काळात त्वचेची काळजी Skin Care घेणं आणि चेहरा तजेलदार ठेवणं म्हणजे एक मोठा आवाहनच असतं. अशा मध्ये महागड्या स्किन केअर प्रोडक्टमध्ये पैसे टाकून चेहऱ्यावर केमिकल्सचा भडिमार करणं म्हणजे आणखी मोठी जोखीम असते.

कारण अनेकदा हे प्राॅडक्ट तात्पुरता दिलासा देत असले तरी भविष्यात त्वचेसाठी Skin ते धोकादायक ठरू शकतात. 

बाजारातील केमिकलयुक्त Skin care प्रोडक्ट वापरण्याएवजी तुम्ही काही घरगुती उपायांनी चेहऱ्याची चमक वाढवू शकता. तसचं पिंपल्सची समस्या देखील दूर करु शकता. पाहुयात चेहऱ्याची टॅनिंग दूर करून चेहरा चमकवण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय. home remedies for glowing sking

1. हळद बेसन- हळद आणि बेसनामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. हळदीमध्ये असेलल्या अँटीऑक्सिंडंट गुणधर्मामुले चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. तसचं यातील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे पिंपल्सही दूर होतात.

यासाठी एका वाटीत २ चमचे बेसन पीठ आणि १ चमचा हळद घ्या. दूध किंवा पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. त्यानंतर १५-२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा या होममे़ड फेस पॅकचा वापर केल्यास चेहरा उजळण्यास मदत होईल. remove taning 

हे देखिल वाचा-

Glowing Skin Home Remedies
Skin Care Tips : सनस्क्रीनवर असलेल्या SPF लेबलचा अर्थ काय, आपल्या स्कीनला कसा फायदा होतो?

२. मधाचा वापर- जर तुम्ही पिंपल्स आणि चेहरा डल झाल्याने चिंतेत असाल तर मधाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. मध चेहऱ्याला मॉइश्चराइस करुन चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असल्याने पिंपल्सची समस्या दूर होते. तसचं मध पिंगमेंटेशनचे डाग फिके करण्यास मदत करतं. Honey For glowing skin

स्वच्छ चेहऱ्यावर तुम्ही थेट मध लावू शकता. चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावावं. मिनिटभर मधाने चेहऱ्याला मसाज करावं. त्यांनतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहरा स्वच्छ होवून चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा चमकू लागेल.

३. टोमॅटो- टोमॅटोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. यासाठी टोमॅटोच्या स्लाइसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा.

त्यानंतर १० मिनिट टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवून सुती कापडाने कोरडा करावा आणि माइश्चराइजर लावाव . यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. tomato benefits for healthy skin 

४. ऑलिव्ह ऑईल- जर तुमची त्वचा ड्राय असेल तर ऑलिव्ह ऑईलमुले तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होवू शकतात. ऑलिव्ह ऑईल अर्ली एजिंगची समस्या कमी करतं. तसचं उन्हामुळे होणारं त्वचेचं नुकसान भरून काढण्यास मदत होते. त्वचा रिपेअर करून चमकदार बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे. 

यासाठी ऑलिव्ह आईलने चेहऱ्याला ३-४ मिनिटं मसाज करा. त्यानंतर चेहऱ्याला स्टिम घ्या किंवा एखादा टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो पिळून घ्या आणि चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा पुसून घ्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. 

५. बटाटा- बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि टॅनिंग दूर करणं शक्य आहे. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला असेल तरी बटाट्याचा मास्क वापरल्याने ग्लो पुन्हा येण्यास मदत होईल.

कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे करावा. बटाट्याचा किस चेहऱ्यावर १५ मिनिटं ठेवून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. skin care

यासोबतच उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं, फळांचं सेवन करणं याच्या मदतीने तुम्ही त्वचा हायड्रेट ठेवू शकता. शिवाय या काही घरात उपल्बध असलेल्या वस्तूंचा वापर करून तुम्ही उन्हाळ्यामध्ये देखील चेहऱ्यावर ग्लो टिकवून ठेवू शकता आणि त्वचेचं रक्षण करू शकता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com