इंग्लंडमधील आईच्या दूधावर अमेरिकेतील बाळांचा निर्वाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

breastmilk

इंग्लंडमधील आईच्या दूधावर अमेरिकेतील बाळांचा निर्वाह

मुंबई : अमेरिकेत नवजात अर्भकांच्या 'बेबी फॉर्म्युला' या खाद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने तेथील पालक सध्या चिंतेत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शेजारच्या इंग्लंडमधील एका महिलेने पुढाकार घेतला आहे. तिने आपल्या स्तनाचे दूध काढून ते विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.

हेही वाचा: स्तनपान करा, मूल लठ्ठ होणार नाही; आईचे दूध बाळासाठी कवचकुंडले

अल्यासा चिट्टी यांच्याकडे सध्या त्यांच्या दुधाने भरलेले ३ फ्रीजर्स आहेत. यात त्यांनी ११८ लीटर दूध साठवून ठेवले आहे. आपल्याकडे अतिरिक्त दूध असल्याची जाणीव झाल्यावर अल्यासा यांनी ते दूध स्थानिक दूधपेढीला देण्याचा विचार केला; मात्र त्याऐवजी त्यांनी ते ऑनलाइन विकण्याचा पर्याय स्वीकारला.

अल्यासा यांच्या मुलीला spinal muscular atrophy आहे. तसेच त्या आणि त्यांचे पती कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. त्यामुळे दूधपेढीपर्यंत जाऊन सर्व दूध तिथे देणे त्यांना शक्य झाले नाही.

अल्यासा यांना आपले दूध १ डॉलर प्रतिलीटर या दराने विकायचे होते; मात्र अमेरिकेतील पालकांची गैरसोय त्यांना कळते आहे. त्यामुळे त्यांनी पालकांच्या मागणीनुसार दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: माता अमृत मदर्स मिल्क बॅंकेमुळे 512 बाळांना मिळाले आईचे दूध 

फेब्रुवारीत बेबी फॉर्म्युला प्यायल्यानंतर दोन बालकांचा मृत्यू झाल्यामुळे बाजारातील सर्व माल मागे घेण्यात आला. त्यामुळे सध्या अमेरिकेत बेबी फॉर्म्युलाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पालकांना बाळांची भूक भागवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही परिस्थिती एका रात्रीत उद्भवलेली नाही. गेले सात महिने तिथे ही स्थिती आहे. बेबी फॉर्म्युलाच्या शोधात निघालेले पालक रिकाम्या हाती परतत आहेत. त्यांना परदेशातून फॉर्म्युला मागवावा लागत आहे.

चाचणीमध्ये बेबी फॉर्म्युला निर्दोष आढळले; मात्र अद्याप निर्मिती आणि पुरवठा सुरळीत झालेला नाही. ११ हजार किरकोळ विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेबी फॉर्म्युलाच्या उपलब्धतेत सरासरी ४३ टक्के तुटवडा जाणवत आहे.

Web Title: American Babies Are Feeding On The Breastmilk Of British Mother

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :baby care
go to top