esakal | वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ एवढे उत्साही कसे, जाणून घ्या कारणं| Amitabh Bachhan Fitness Secrets
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ एवढे उत्साही कसे, जाणून घ्या कारणं

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आज अमिताभ बच्चन 79वा वाढदिवस साजरा करत आहेत. एवढ्या वयात करत असलेले अथक काम, वेळेचे पक्के नियोजन, तरूणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्याकडे येतो कुठून हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्यांच्या फिटनेसचं रहस्य समजून तसचं फिट राहायचं असेल तर या त्यांच्यासारखे हे रूल्स फॉलो करा.

असा आहे आहार

अमिताभ निरोगी राहण्यासाठी दररोज भरपूर पाणी पितात. याशिवाय नारळाचे पाणी, आवळा रस, प्रोटीन ड्रींक्सचे सेवन करतात. नाश्त्याला केळी, खजूर, शेव हे पदार्थ असतात. तर प्रोबायोटिक पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश असतो. तसेच तुळशीची पानेही नियमित खातात.

हेही वाचा: प्रत्येक ठिकाणी मिळाला नकार, 'महानायका'चा प्रवास नव्हता सोपा

80 कडे वाटचाल म्हणत अमिताभनी इंस्टाग्रामवर हा फोटो टाकला असून त्यांच्या फिटनेसचे रहस्य नियमित व्यायाम हेच आहे.

80 कडे वाटचाल म्हणत अमिताभनी इंस्टाग्रामवर हा फोटो टाकला असून त्यांच्या फिटनेसचे रहस्य नियमित व्यायाम हेच आहे.

नियमित व्यायाम

अमिताभ दररोज व्यायामाला महत्व देतात. जीममध्ये वर्कआऊट करणे, मॉर्निंग वॉक हा त्यांच्या आषुय्याचा भाग आहे. मानसिक शांतीसाठी प्रायाणाम,योगासने करतात.

हेही वाचा: निरोगी जीवनासाठी व्यायाम महत्त्वाचा

सिगारेट- दारूपासून दूर

चित्रपटात कितीही दारू पिण्याचे, सिगारटे ओढण्याचे सीन असले तरी तो सीन ते देतात. पण खरया आयुष्यात सिगारेट आणि दारू पासून ते कोसो लांब आहेत. त्यामुळेच आजही त्यांचा आवाज आणि व्यक्तिमत्व भारदस्त आहे.

चहा- कॉफीही नाही

एकेकाळी अमिताभ कॉफीचे शौकीन होते. पण आता चांगल्या आरोग्यासाठी चहा-कॉफी ते पित नाहीत.

मांसाहारापासून दूर

अमिताभ मांसाहारही करत नाहीत. मध्यंतरी त्यांनी एका पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला मांसाहार खूप आवडायचा पण आता ते आणि जया बच्चन दोघेही शाकाहारी झाले आहेत असे म्हटले आहे.

loading image
go to top