esakal | निरोगी जीवनासाठी व्यायाम महत्त्वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

निरोगी जीवनासाठी व्यायाम महत्त्वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडा : स्वतःचे शरीर सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी नित्यनेमाने व्यायाम करणे आज महत्त्वाचे बनले आहे. तरुणांनी व्यायामावर भर द्यावा. त्यामुळे आपल्याला आरोग्यदायी व दीर्घायुष्य लाभत असल्याचे प्रतिपादन वाड्याचे (wada) उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी पाटील यांनी नाणे येथे बोलताना केले. नाणे येथे जेराई फिटनेस कंपनीच्या (Jerai Fitness Company) सौजन्याने तयार केलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी ते बोलत होते. भवानजी पाटील पुढे म्हणाले की, मी माझ्या जीवनात अनेक कारखानदार पाहिले; पण असे दातृत्व असलेले राजेश राय कारखानदार हे प्रथमच पाहिले. तरुणांनी त्यांच्या दातृत्वाचा फायदा घेऊन नियमित व्यायाम करून सैनिक, पोलिस, होमगार्ड या क्षेत्रात संधी निर्माण करून रोजगार मिळवावा. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी तरुणांना आपला शरीरसौष्ठवाचा दुरुपयोग न करता गावाला, कुटुंबाला त्याचा उपयोग कसा होईल, असे सांगितले.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी वापरत असलेला फोन, सीमकार्ड अन् फिटनेस फंडा, जाणून घ्या खास गोष्टी

जेराई फिटनेस कंपनीचे मालक राजेश राय आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, चमकदार खेळाडू हे ग्रामीण भागातून येत असतात; मात्र त्यांना अत्याधुनिक सेवा सुविधा मिळत नाहीत. म्हणून मी ग्रामीण | भागातील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून विभागवार व्यायामशाळा करण्याचे जाहीर करून या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे प्रयत्न करीत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेराई फिटनेसचे सहकारी व नाणे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

loading image
go to top